Friday, June 14, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमाथेरानच्या प्रशासक सुरेखा भणगे यांच्या पुढाकाराने महिलांसाठी हिरकणी कक्षाची सुविधा..

माथेरानच्या प्रशासक सुरेखा भणगे यांच्या पुढाकाराने महिलांसाठी हिरकणी कक्षाची सुविधा..

अष्ट दिशा प्रतिनिधी (दत्ता शिंदे) माथेरान हे पर्यटकांचे आवडते ठिकाण या ठिकाणी अबाल वृध्द तसेच बच्चे कंपनीची मोठ्या प्रमाणात ये जा असते अगदी जरे माथेरान पुण्या मुंबई पासून जवळच असले तरी नेरळ माथेरान येथेच पर्यटक थकतात तेच पर्यटकांचे होणारे हेलपटणा लक्षात घेऊन घेऊन माथेरानच्या कार्यतत्पर उत्तम प्रशासक सुरेखा भणगे ( शिंदे )यांनी माथेरानच्या प्रवेश द्वार येथे प्रशस्त खोलित ऐका बजुला हिरकणी कक्ष चालु केले आहे.
महिला वर्गा साठी येणाऱ्या पर्यटकांना ऐन गर्दीच्या वेळी प्रवासातून आल्यावर येथील मुख्य प्रवेशद्वार असणाऱ्या दस्तुरी नाक्यावर अनेकदा बाहेर पडताना ताटकळत उभे राहावे लागत असे. विशेषतः महिला पर्यटकांना आपल्या लहान लहान बाळांना घेऊन या गर्दीच्या ठिकाणी स्तनपान सुध्दा करणे अवघड होते त्यामुळे दस्तुरी येथील नगरपरिषदेच्या प्रवासी कर वसुली जागेतील एका प्रशस्त खोलीत नगरपरिषदेच्या उत्तम प्रशासक सुरेखा भणगे ( शिंदे) यांच्या पुढाकाराने हिरकणी कक्ष उभारण्यात चालु केल्याने यापुढे स्थनदा मातांना आपल्या बाळांना स्तनपान करणे शक्य होणार आहे.
जेष्ठांना सुध्दा याठिकाणी दुसऱ्या बाजूच्या जागेत विश्रांती साठी खोली असणार आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या पर्यटकांना आपला प्रवास सुखकर होवा व योग्य प्रकारे पर्यटकांना मार्गदर्शन व्हावे इथले विविध मुख्य पॉइंट्स त्याचप्रमाणे वाहतुकीच्या सुविधे बाबतीत माहिती मिळावी यासाठी माहिती केंद्र उभारण्यात आले आहे. त्यामुळे साहजिकच पर्यटकांना याचा लाभ घेता येणार आहे. अल्पावधीतच सुरेखा भणगे यांनी आपल्या परीने पर्यटकांना, नागरिकांना अभिप्रेत कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. त्यामुळे त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page