Sunday, July 14, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमाथेरानला जीवन प्राधिकरणाचा गलथान कारभार..अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने महिला वर्गात तीव्र...

माथेरानला जीवन प्राधिकरणाचा गलथान कारभार..अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने महिला वर्गात तीव्र संताप..

माथेरान (दत्ता शिंदे) कोरोनाच्या महामारीने माथेरानमध्ये सध्या पर्यटन व्यवसाय पूर्तता बंद झाला असल्याने हॉटेल व्यावसायिक एक महिन्या अगोदरच हॉटेल बंद आहेत आत्ता फक्त स्थानिकांनाच सुरळीत पाणी पुरवठा होईल अशी आशा माथेरानकरांना होती परंतु पर्यटक नसताना देखील माथेरान जीवन प्राधिकारणाचा अनागोंदी कारभार सुरूच असून त्या मुळे स्थानिकांना तीव्र पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे.

मागील एकवर्षापासून हे रडगाणे सुरूच असल्याने जलप्राधिकारणाचा भोंगळ कारभार ह्यामुळे समोर येत आहे.चार दिवसांपूर्वीच माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी जलप्राधिकारण अधिकाऱ्यांशी चर्चा करून माथेरानचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा ह्या संदर्भात सविस्तर चर्चा केली होती व अनेक त्रुटी अधिकाऱ्यांच्या नजरेस आणून दिल्या होत्या व त्यावेळी माथेरानचा पाणीपुरवठा नियमित होईल अशी ग्वाही ह्यावेळी अधिकाऱ्यांनी दिली होती पण दुसऱ्याच दिवशी जलप्राधिकरणाच्या ढिसाळ कारभाराचा फटका येथील काही प्रभागांना बसत आहे.

काही ठीकानी दिवसभर पाणी च दिले गेले नाही व दुसऱ्या दिवशी गडुल पाण्याचा पुरवठा केला गेला अनेकवेळा जलप्राधिकरण अधिकाऱ्यांशी चर्चा करून ही माथेरानच्या पाण्याची स्थिती जैसे थे असल्याने नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे.माथेरान मध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या बदलण्याचे काम ठेकेदारद्वारे पूर्ण केले गेले आहे पण हे काम करताना त्याकडे लक्ष न दिले गेल्यामुळे घाईगडबडीत उरकण्यात आले आहे.

त्याचा फटका आता येथील नागरिकांना बसत आहे अनेक ठिकाणी जलवाहिन्या फुटण्यास सुरवात झाली असून अनेक ठिकाणी जलवाहिन्यामध्ये कचरा जमा होत आहे माथेरान बाजारपेठेत अशीच जलवाहिनी फुटल्यावर पाहिले असता त्यात चक्क एक चप्पल व पाण्याची रिकामी बाटली आढळून आल्याने ह्या ठेकेदारांच्या कामावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे व ह्या ठेकेदाराने अनेक ठिकाणी अशीच ढिसाळ कामे करून ही त्याला अधिकारी वर्गाकडून पाठीशी घालण्याचे काम सुरू असल्याने दिसून येत आहे.

माथेरांमधील स्थानिक कर्मचारी आपल्या परीने नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा देण्याचा प्रयत्न करीत आहेत पण नेरळ माथेरान जलवाहिनी वरील ठेकेदार पाणी पुरवठ्या कडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने नेरळ हुन माथेरांकडे होणारा पाणीपुरवठा वारंवार खंडित होत आहे व ह्या जलवाहिनीवर अनधिकृत जोडण्या असलेल्यानं मात्र चोवीस तास अखंड पाणी पुरवठा होत आहे व त्याचा थेट फटका माथेरांकरांच्या पाणी पुरवठ्यावर होत आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page