Tuesday, September 26, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडमाथेरान आर.सी.नाका ते रेल्वे स्टेशन नाका येथे वृक्षारोपण केल्यानंतर अज्ञातां कडून रोपे...

माथेरान आर.सी.नाका ते रेल्वे स्टेशन नाका येथे वृक्षारोपण केल्यानंतर अज्ञातां कडून रोपे तोडली.

.

वृक्षारोपण केल्यानंतर अज्ञातांकडून रोपे तोडली.स्थानिकांमधून तीव्र नाराजी..

दत्ता शिंदे …..माथेरान

पावसाळा संपत असतानाच नगरपरिषदेने दि.४सप्टेंबर रोजी मुख्य रस्त्यावर वृक्षारोपण केले होते परंतु काही अपप्रवृत्ती आणि हीन वृत्तीच्या लोकांनी काही रोपे अक्षरशः तोडून टाकली आहेत. अशा वाईट वृत्तीचा सोशल मीडियावर जाहीर निषेध व्यक्त केला जात आहे.केवळ वनराई मुळे इथे थंड गारवा असल्याने पर्यटक माथेरानला सर्वाधिक पसंती देत असतात.येथील संपूर्ण भूभाग हा बिनशेतीचा असल्यामुळे सर्वांचेच जीवनमान हे पर्यटन शेतीवर अवलंबून असते.

अनेक झाडे नुकताच झालेल्या निसर्ग चक्री वादळात नामशेष झाली होती याच पार्श्वभूमीवर नगरपरिषदेने जी काही रोपे आणली होती त्याचे रोपण करण्यास सुरुवात केली होती.याच मुख्य रहदारीच्या रस्त्यावर बाराही महिने घोडे बांधले जातात त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या पादचा-यांना अनेकदा जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. निदान याठिकाणी आगामी काळात घोडे बांधले जाऊ नयेत जेणेकरून आर सी शहा दुकान ते रेल्वे स्टेशन दिवाडकर हॉटेल पर्यंत घोड्यांच्या मलमूत्राने जो काही बकालपणा आणि दुर्गंधी येत आहे ती या वृक्षारोपण मुळे संपुष्टात येणार होती परंतु काही अज्ञातांकडून अपप्रवृत्ती आणि हीन वृत्तीच्या लोकांनी लावलेली रोपे तोडून टाकली आहेत यामुळेच सर्व स्तरातून या गोष्टीचा निषेध व्यक्त केला जात आहे. अशा लोकांवर कठोर कारवाई करण्यात यावी.

असे कृत्य करणा-या हीन प्रवृत्तींना जागीच ठेचले पाहीजे अनेक वेळा पालीकेने काही गोष्टीत सकारात्मक बदल घडवुन आणला तर उदाहरणार्थ दसतुरी येथील घोडा हातरीक्षा,कुली यांच्या मजुरी बाबतीत लावलेले दर फलक फाडणे,पाॅईंट दिशादर्शक बोर्डचा आरो फिरविणे त्यातील अंतर खोडणे,पालीकेने बसविलेल्या बाकडयावर दगड टाकुण बाकडा तोडणे,दसतुरीला जाणार्या दिवा बत्तीचे फिवुज काढुन जाणुन बुजुन रस्ता अंधारमय करणे,सोलर दिव्यांची बॅटरी चोरणे आशा अनेक सार्वजनिक गोष्टीचे काही समाज कंटक नुकसान करत आले आहेत.

त्यांच्यावर योग्य वेळी कारवाईचा बडगा उगारला असता तर त्यांची ही हिंमत झाली नसती.सदर झाडे तोडणा-याचा नुसता निषेध न करता पोलीस ठाण्यात अनोळखी माणसाच्या नावाने तक्रार दाखल करावी.नगरपरिषदेने लावलेले सिसीटीवी जर का सुस्थितीत असतील तर वरील गोष्टींचा नक्कीच छडा लागु शकेल.कार्यतत्पर प्रशासकीय अधिकारी वर्गाने ताबडतोब सीसीटीव्ही द्वारे संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्यावर पोलिसांमार्फत कडक कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.

- Advertisment -