Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमाथेरान जीवन प्राधिकारणाचा भोंगळ कारभार...शहरात पाणी पुरवठा खंडित नागरिकांचे हाल..

माथेरान जीवन प्राधिकारणाचा भोंगळ कारभार…शहरात पाणी पुरवठा खंडित नागरिकांचे हाल..

शारलोट लेक अथवा फिल्टर हाऊस येथे जबाब दार व्यक्ती नसल्याने जीवन वाऱ्यावर..

दता शिंदे….माथेरान
माथेरान जीवन प्राधिकरणाचा भोंगळ कारभार .ऐन सणासुदीला पाणी पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने जीवन प्राधिकरणाच्या कारभारा बाबत नागरिकां मध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.माथेरान हे पर्यटन स्थळ असल्याने ह्या ठिकाणी अव्वाच्या सव्वा पाण्याचे दर आकारून माथेरान पाणी खाते स्थानिकांची लूट करीत आहे त्यातच ह्या वर्षी कोरोनाचे संकट असून त्याचा फटका माथेरानच्या पर्यटन व्यवसायाला देखील बसला आहे.

अगदी मार्च पासून येथील व्यसवसाय बंद असून माथेरान जीवन प्राधिकरणाने अजून पर्यंत पाण्याचे वाणिज्य दरा मध्ये कोणतीही सवलत दिली नाही.उलट पाण्या ची नेहमीच तक्रार प्रत्येक विभागातून ऐकण्यास मिळत आहे.वीज नसली की पाणी नाही हे जणू पाणी खात्याचे समीकरण जमलं आहे.स्थानिकांनी अधिकाऱयांना फोन केला की एकच उत्तर मिळते विजेची तांत्रिक अडचण झाली आहे त्या मुळे पाणी येणार नाही.

अस बोलून हात झडकत असतात.परंतु अधिकाऱयांच्या दुर्लक्षा मुले माथेरान शारलोट लेक येथे एक जनरेटर होते परंतु त्याचे देखभाल न केल्याने दे भंगार मध्ये गेले..माथेरान मध्ये शारलोट तलाव व दुसरे नेरळ कुंभे येथून पाणी पुरवठा होत असतो परंतु दोन्ही ठिकाणी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने माथेरानकरांना नाहक त्रास भोगावा लागत आहे.


माथेरान ची जीवन प्राधिकरण वाऱ्यावरच असून त्याला वाली च कोण असल्याचे सध्या तरी चित्र दिसून येत आहे.येथे कोणालाही तक्रार करायची असेल तर दोन्हीही ठिकाणी संपर्क करण्या साठी साधन नाही.तसेच येथे कोणताही जबाबदार अधिकारी असल्याने स्थानिकांची मोठी अडचण होत आहे.त्या मुळे माथेरान मध्ये कायम स्वरूपी इनंचार्ज असला पाहिजे अशी येथील स्थानिकांची मागणी आहे…

- Advertisment -

You cannot copy content of this page