माथेरान नगरपरिषदेचे कामगार कायम स्वरूपी रुजू..

0
80

माथेरान (दत्ता शिंदे)गिरीस्थान नगरपरिषद यांचा परिक्षावधीन कालावधी समाप्त करून काही लिपिक तसेच काही सफाई कामगारांना नियमित सेवेत रुजू करण्यात आले आहे.

यामध्ये काहीजण हे वारसा हक्काने कामावर रुजू होते. लिपिक जयवंत वर्तक, लिपिक अजय साळुंखे, तर सफाई कामगार म्हणून दीपा सोनावले,चैताली चव्हाण, अनु सारसर, अर्जुन मुदलियार, हिमांशू सोनावले, अनिल ढोले, रवी लोटणकर या कामगारांना कायमस्वरूपी नियमित करण्यात आले आहे.


त्यामुळे या सर्व कामगारांनी मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव, नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, उप नगराध्यक्ष आकाश चौधरी, गटनेते प्रसाद सावंत,कार्यालय अधीक्षक रणजित कांबळे यांसह युनियन अध्यक्षांचे आभार मानले.