माथेरान पर्यटन नगरीवर रूम एजंट चा डोळा..

0
124

कोरोनाच्या पाश्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने लक्ष देण्याची गरज….

दत्ता शिंदे —–माथेरान
सह्याद्रीच्या डोंगररांगा मध्ये वसलेले टुमदार थंड हवेचे ठिकाण माथेरान येथे ब्रिटिश कालावधी पासूनच इंधनावर चालणाऱ्या वाहनास पूर्णतः बंदी असल्याने माथेरान ला वर्षा काठी आठ ते दहा लाख जगाच्या काण्या कोपऱ्यातून पर्यटक मोठ्या आनंदाने दोन चार दिवस विश्रांती साठी येथे येत असतात.

येथे घनदाट जंगल असल्याने व मोटार वाहनास बंदी असल्याने या ठिकाणी ऑक्सिजन युक्त शुद्ध व थंडगार हवा हेच येथील प्रामुख्याचे वैशिष्ठ होय.म्हणूनच येथे हजारो पर्यटक रोज येत असतात.

माथेरानच्या आजूबाजूला अनेक शहरे व उपनगरे असून जवळच पुण्या मुंबई सारखी प्रगतशील शहरे आहेत.येथील रोज पर्यटक आपली स्वतःची वाहने घेऊन माथेरानला दोन चार दिवसा साठी येत असतात.परंतु माथेरान शहरात मोटार वाहनांना प्रवेश बंदी असल्याने सर्वच वाहने माथेरान प्रवेश द्वार दस्तुरी या ठिकाणी वाहनतळावर पार्किंग करावी लागतात.


पर्यटकांनी आपली वाहने पार्किंग केली की येथूनच बाहेरील रूम दलालांचा पर्यटकांच्या सभोवताली विळखा पडतो.व पर्यटक गांगरून जातो.सद्या कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता बाहेरून आलेले रूम दलाल ह्यांना माथेरान विषयी कुठलीही आस्था नाही ना स्वतःची काळजी ना पर्यटकांची काळजी स्वतःही पर्यटकां बरोबर संवाद साधताना तोंडाला मास्क देखील वापरत नाहीत.

त्याच प्रमाणे रोज येणे जाणे असल्याने जर का माथेरान सारख्या छोट्याशा गावाला कोरोनाचा प्रादुर्भावाने शिरकाव केला तर माथेरानकरांना ह्याचा दूरगामी परिणाम भोगावा लागेल.त्यांना फक्त पैसे एके पैसे.बस बाकी माथेरानच्या बाबतीत काहीच देणे घेणे नाही.जर का बाहेरील रूम दलाल ह्यांना स्थानिक प्रशासनाने वेळीच लगाम नाही घातला तर माथेरान ला येणाऱ्या काळात बरेच काही अजून शिकावे लागेल ह्या साठी माथेरान नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी ह्या कडे लक्ष द्यावे असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे…