Sunday, July 14, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमाथेरान पर्यटन नगरी पर्यटका विना सुनी सुनी..शासनाच्या कडक निरबंधा मुले पर्यटकांची माथेरान...

माथेरान पर्यटन नगरी पर्यटका विना सुनी सुनी..शासनाच्या कडक निरबंधा मुले पर्यटकांची माथेरान कडे पाठ..


शासनाचे कडक निर्बंध की लॉक डाऊन व्यापाऱ्यांरी वर्गात नाराजीचा सूर..


माथेरान- दत्ता शिंदे.


कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव वाढत असल्याने संपूर्ण राज्यात शासनाने कडक निर्बंध घातले असून माथेरान सारख्या थंड हवेच्या ठिकाणी व्यवसायावर मोठा फटका बसला आहे.
माथेरान म्हणलं की थंड हवेचे ठिकाण या ठिकाणी कोणत्याही प्रकारे कारखाने किंवा फळउत्पादक शेती नाही.फक्त पर्यटक हीच शेती बाराही महिने माथेरानची पर्यटकांची वर्दळ असते त्याच पर्यटकांवर माथेरानकरांचा संसाराचा संसाराचा गाडा चालत असतो.

शासनाने असेच कडक निरबन्ध ठेवले तर माथेरानकरांचे जगणे मुस्किल होईल.या ठिकाणी असलेले बाझार पेठ देखील स्थानीकांवर अवलंबून आहे.जर का सर्वच आर्थिक व्यवहार ठप्प झाले तर संसाराचा गाडा चालवायला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.दोन दिवसा पासून माथेरान माथेरान पर्यटकां विना सुना सुना आहे.

संपूर्ण गावात शुकशुकाट असून माथेरान नगरपालिका तसेच पोलीस प्रशासन आपली भूमिका बजावत आहे.माथेरान नगरपालिकेचे कर्मचारी वर्ग गाववस्ती मध्ये ध्वनीक्षेपणाद्वारे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जनजागृती करीत आहे.या ठिकाणी फक्त अत्यावश्यक वस्तू मेडिकल स्टोर,किराणा माल,भाजीपाला,बेकरी,रेस्टॉरंट फक्त पार्सल सेवा चालू आहे.जर का पर्यटकच नाही तर पार्सल सेवा देणार कोणाला हा ही एक प्रश्न आहे.त्या मुळे व्यापारी वर्गात नाराजीचा सूर उमटत आहे.


मार्च अखेर झाला घर भाडे,पाणी बिले वीज बिले,बँकेचे हप्ते देणार कुठून त्यात कोरोनाने डोके वर काढले आहे.कोरोनाच्या वाढनाऱ्या प्रादुर्भावाणे सर्वच व्यवहार ठप्प झाले असून हा एक अघोषित लॉक डाऊन च आहे….

- Advertisment -

You cannot copy content of this page