माथेरान मधील घोड्यांना भुसा वाटपासाठी मदतीचे झरे वाहताहेत भरभरून..

0
65

माथेरान (दत्ता शिंदे) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन काळात प्रथमदर्शनी माथेरान या दुर्गम स्थळावर केवळ घोड्यांच्या खाद्याबाबतीत कुठल्याही प्रकारची कमतरता भासू नये यासाठी इथल्या गोरगरीब अश्वपालकांच्या घोड्यांसाठी अनेक भागातून सढळ हस्ते भरभरून मदतीचे झरे वाहत आहेत.या सुवर्णसंधीचा काहीजण मनमुराद पणे उपभोग घेताना दिसून येत आहे. त्यामुळे एकूणच ४६० घोड्यांची संख्या असणाऱ्या या गावातील अश्वपालकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे.


घोड्याना खाद्य उपलब्ध व्हावे यासाठी येथील धनगर समाजाचे अध्यक्ष, अश्वपाल, काँग्रेस पक्षाचे सक्रीय निष्ठावंत कार्यकर्ते राकेश कोकळे हे नेहमीच पुढाकार घेत असून आपल्या अश्वपालकांसाठी झटताना दिसत आहेत. त्यानी आपल्या ओळखीच्या माध्यमातून अनेक ठिकाणांहून घोड्यांसाठी भुसा उपलब्ध केला आहे. दि.४ रोजी मा. पोलीस महानिरीक्षक ( आयपीएस) अधिकारी,रवींद्र सेनगावकर ह्यांच्या प्रेरणेतून आणि आवाहनामुळे पोलीस अधिकारी समाजातील थोर आणि जबाबदार नागरिक (सर्व स्तरातील व्यक्ती, निवृत्त शासकीय अधिकारी आणि कर्मचारी, डॉक्टर्स, उद्योगपती, मान्यवरांकडून माथेरान मधील घोड्याना (भुसा) वाटप कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडला.

याचा लाभ अश्वपालकांनी घेतला. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष मनोज खेडकर, नगरसेवक शिवाजी शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे, पोलीस निरीक्षक प्रशांत काळे, संतोष आखाडे, त्याचप्रमाणे गावातील अश्वपालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरीक,पोलीस कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.