![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(!empty($image5)); {?>
![]()
} ?>
भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) येथील पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील असलेल्या भागात वाहनांना बंदी असल्याने अनेक वर्षांच्या लढ्यानंतर माथेरान शहरात पर्यावरण पूरक ई-रिक्षा ५ डिसेंबर २०२३ रोजी सुरु करण्यात आली आहे . दरम्यान ई-रिक्षांबद्दल काही स्थानिक यांच्यात असलेल्या गैरसमजाबाबत आपण स्वतः माथेरानमध्ये येऊन चर्चा करू, या आश्वासनानंतर त्यानुसार माथेरान मध्ये येऊन कर्जत – खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी माथेरानमधील सर्व नागरिकांची आणि व्यावसायिक यांची कम्युनिटी सेंटरमध्ये माथेरान मधील व्यापारी, हातरिक्षा चालक, अश्वपाल संघटना, राजकीय व्यक्ती आणि नागरिक यांची बैठक घेतली.
या बैठकीत ई-रिक्षाबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली व कोणत्याही व्यक्तीचा व्यवसाय हातातून जाणार नाही , याची काळजी घेण्यासाठी आणि धोरण ठरविण्यासाठी सुकाणू समिती स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय या बैठकीत घेण्यात आला.” सौ सोनार की , एक लोहार की ” , या उक्तीप्रमाणे आमदार महेंद्रशेठ थोरवे मतदार संघात निर्णय घेत असताना माथेरान येथील येणाऱ्या पर्यटकांचा व्यवसाय सर्वांना मिळेल , अशी ग्वाही देत ऐतिहासिक निर्णय घेऊन सर्वांना न्याय दिला आहे.ई – रिक्षा हि माथेरान मधील गरज ओळखून सर्वांनी सहकार्य करा , असे आवाहन देखील त्यांनी केले.
झालेल्या या ऐतिहासिक निर्णयाच्या बैठकीत माथेरान नगर परिषदेच्या प्रशासक सुरेखा भणगे , माथेरानचे महसूल अधिक्षक दीक्षांत देशपांडे , पोलीस निरीक्षक शेखर लव्हे , माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर सह अनेक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी सर्वांची मते जाणून घेतली.