Thursday, September 28, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडमाथेरान मधील स्थानिक अश्वपालकांना भुसा वाटप….

माथेरान मधील स्थानिक अश्वपालकांना भुसा वाटप….

माथेरान करांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी व्यवसाय पूर्वपदावर येणे आवश्यक — मनोज खेडकर माजी नगराध्यक्ष..

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन मुळे केवळ पर्यटनावर आधारित असलेल्या माथेरान करांची आर्थिक परिस्थिती खूपच खालावली असल्याने मागील सहा महिन्यांपासून बंद करण्यात आलेले व्यवसाय पूर्वपदावर आल्याशिवाय गत्यंतर नाही. कोरोना या महाभयंकर त्रासाच्या सोबत राहून नियमानुसार पालन केल्यास,प्रत्येकाने आपापली आणि कुटुंबातील व्यक्तींची योग्य प्रकारे काळजी घेतल्यास आपण चांगल्या पद्धतीने पर्यटकांना सेवा उपलब्ध करून देऊ शकतो असे मत काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी व्यक्त केले.स्थानिक अश्वपालकांना भुसा वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.


ते पुढे म्हणाले की,माथेरान काँग्रेस पक्षाच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात सर्व कार्यकर्ते एकदिलाने कार्यरत असतात.या लॉक डाऊन काळात आम्ही सरसकट नागरिकांना पाच किलो खाद्यतेल,पाच किलो साखर आणि दोन किलोच्या सहा डाळींचे वाटप केले होते तर नगरसेवक शिवाजी शिंदे यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांना प्रत्येक कुटुंबाला पाच किलो खाद्यतेलाचे वाटप केले होते.

काँग्रेसचे कोषाध्यक्ष नितीन शहा यांनी सुध्दा आपल्या मित्र मंडळी त्याचप्रमाणे संबंधातील व्यक्तींकडून मोठया प्रमाणावर जीवनावश्यक वस्तूंच्या किट्स वाटप केल्या आहेत.
लॉक डाऊन मुळे येथील अश्वपालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हाताला रोजगार उपलब्ध नाही त्यामुळे सुरुवातीला दोन महिन्यांपूर्वी अनेक सेवाभावी संस्थामार्फत घोड्यांसाठी भुसा वाटप करण्यात आला होता.

तदनंतर सध्याचा हा काळ खूपच कठीण असल्याने आपल्या घोड्यांना खाद्य कसे द्यावे याच विवंचनेत असतानाच धनगर समाजाचे अध्यक्ष राकेश कोकळे यांनी सदर बाब मनोज खेडकर यांच्या निदर्शनास आणून दिली त्यानुसार दि.२८ऑगस्ट रोजी जवळपास १६० गोणी भुशाचे वाटप स्थानिक अश्वपालकांना दस्तुरी नाका येथे करण्यात आले.त्यामुळे अश्वपालकांना या कठीण काळात आपल्या घोड्यांसाठी आधार झाला आहे.

यावेळी नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते शिवाजी शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे, काँग्रेस पक्षाचे कोषाध्यक्ष नितीन शहा,माथेरान नागरी सहकारी पतसंस्था सभापती हेमंत पवार,युवा काँग्रेस अध्यक्ष आदित्य भिल्लारे, धनगर समाज अध्यक्ष राकेश कोकळे, केतन रामाने, अफजल डोंगरे,उद्योजक भास्कर शिंदे,मामु वलगे,स्वप्नील गोसावी, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष तथा माजी नगरसेवक संतोष लखन,बिलाल महापुळे,हर्ष शिंदे आदी उपस्थित होते.

काँग्रेस पक्षाने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत इथल्या नागरिकांना पक्षाच्या माध्यमातून
सहकार्याची भूमिका पार पाडली आहे. कोरोनाच्या संवेदनशील काळात सुध्दा आपल्या परीने मदतीला काँग्रेस पक्ष धावून आला आहे. त्यामुळे सर्वाना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे. इथल्या सर्वसामान्य नागरिकांना, मुलांना शैक्षणिक तसेच वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मनोज खेडकर यांचा हातखंडा आहे.निपक्षपणे ते सदैव सेवाभावी कार्य करण्यास पुढाकार घेत आहेत.कोरोना काळात सर्वांच्या मनाची तयारी झाल्यासच इथले पर्यटन सुरू होणार आहे.जनजीवन सुरळीत झाल्याशिवाय व्यवसायाला गती मिळणार नाही.

शिवाजी शिंदे –विरोधी पक्षनेते माथेरान नगरपरिषद

खरोखरच आम्हाला या कठीण समयी आमच्या घोड्यांना खाद्य पुरवठा केल्याबद्दल अश्वपालकांच्या वतीने मनोज खेडकर यांचे आभारी आहोत.

राकेश कोकळे -अध्यक्ष धनगर समाज माथेरान

- Advertisment -