Wednesday, September 27, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडमाथेरान मध्ये अश्वखाद्य वातपा साठी पोलिसांचा पुढाकार..

माथेरान मध्ये अश्वखाद्य वातपा साठी पोलिसांचा पुढाकार..

माथेरान ( दत्ता शिंदे ) कोरोनाने प्रभावित माथेरानच्या पर्यटनास बंदी झाल्यामुळे येथील व्यावसायिक अडचणीत आलेले आहेत त्यात येथील अश्वाचालकांना त्याचा फटका जास्त प्रमाणात बसला होता तशा बातम्या स्थानिक वृत्तपत्रांमध्ये झळकल्यानंतर घोड्यांसाठी मदतीचा ओघ सुरू झाला होता त्यात आता येथील पोलिसांचा ही हातभार लागला असून उमंग ह्या सामाजिक संस्था व कर्जत माथेरान पोलिसांच्या वतीने येथील अश्वचालकांना व येथील माकडांना चाऱ्याचे वाटप कर्जतचे डी वाय एस पी श्री अनिल घेरडीकर यांच्या हस्ते माथेरान मध्ये वाटप करण्यात आले.


माथेरान पोलीस स्टेशन येथे काही वर्षांपूर्वी ब्लॅकी व ब्राऊनी हे दोन घोडे पोलिसांसाठी कार्यरत होते त्यामुळे पोलिसांसाठी घोडे हे नेहमीच जिव्हाळ्याचे राहिले आहेत लॉकडाऊन मध्ये व्यवसाय बंद पडल्याने ह्या मुक्या जनावरांना पौष्टिक चारा मिळावा ह्या करिता डी वाय एस पी श्री अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली माथेरान मध्ये कार्यरत असलेले पोलीस श्री महेंद्र राठोड यांच्या प्रयत्नाने डोंबिवली येथील सामाजिक संस्था उमंग यांच्या समवेत येथील स्थानिक अश्व चालकांना घोड्यांसाठी पौष्टिक चारा व माकडांसाठी खाद्य उपलब्द करण्यात आले व त्याचे वाटप माथेरांमधील 460 अश्व चालकांना डी वाय एस पी अनिल घेरडीकर यांच्या हस्ते समान करण्यात आलेे.

ह्यावेळी माथेरानचे एपीआय श्री प्रशांत काळे पोलीस महेंद्र राठोड ,पोलीस श्री पाटील अश्वपाल संघटनेच्या अध्यक्षा आशाताई कदम शैलेश शिंदे व उमंग फाउंडेशनचे संकेत तांबे अध्यक्ष वैभव रत्नपारखी सचिव स्वप्नील तांबे खजिनदार व सर्व अश्वचालक उपस्थित होते ह्यावेळी वाटप करताना सामाजिक अंतर ठेवून वाटप करण्यात आले. (लॉक डाऊन मुळे माथेरानचे पर्यटन बंद आहे त्यामुळे येथील अश्वाचालकांना मदतीची गरज आहे व ही आमच्याकडून छोटीशी मदत आहे पण ह्यापुढे जाऊन अधिकाधिक मदत अश्व चालकांना मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत श्री अनिल घेरडीकर डी वाय एस पी कर्जत) (माथेरान मधील पोलीस श्री महेंद्र राठोड यांनी माथेरानच्या घोड्यांना मदतीची गरज असल्याचे आव्हाहन केले होते त्यामुळे तातडीने आम्ही उमंग फाउंडेशनच्या वतीने येथील घोड्यांना माकडांसाठी खाद्य उपलब्द केले आहे श्री संकेत तांबे अध्यक्ष उमंग फाउंडेशन मुंबई.

- Advertisment -