Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमाथेरान मध्ये गॅस टाक्यांची वाहतूक होते घोड्यावर..

माथेरान मध्ये गॅस टाक्यांची वाहतूक होते घोड्यावर..

पर्यावरण प्रेमीचे दुर्लक्ष….

दत्ता शिंदे -माथेरान

माथेरान हे पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे येथे घडणाऱ्या लहान सहान गोष्टींवर पर्याव रण प्रेमींची नेहमीच नजर असते पण माथेरानमधील घोड्यांवर गॅस सारख्या ज्वलनशील व वजनी मालाची सर्रास वाहतूक वर्षोनुवर्षे केली जात आहे.

त्याकडे मात्र हेतूपुरस्पर दुर्लक्ष केले जात असून माथेरान करांच्या गॅसवाहतुकसाठी वाहन मिळावे ह्या मागणी साठी गेली अनेक वर्षे स्थानिक करीत आहेत परंतु ह्या मागणी कडे जाणीव पूर्वक दुलक्ष केले जात आहे.

माथेरानमध्ये सर्व प्रकारच्या इंधनावर चालणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी आहे पण येथील पर्यटन दृष्ट्या महत्व ओळखून ब्रिटिशांनी दूरदृष्टी राखून येथे मिनिट्रेन ला परवानगी दिली होती त्यानंतर शेकडो वर्षानंतर माथेरानकरांना अनेक संघर्षा नंतर रुग्णवाहिका,मिनीबस, व अग्निशमन सेवा ह्या करिता परवानगी मिळाली आहे. पण येथील वाहतुकी संबंधी अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ज्यामध्ये मुख्यत्वे ई रिक्षा, कचरा संकलनासाठी वाहन व्यवस्था,जीवनावश्यक वस्तूंसाठी वाहन परवानगी,जेष्ठ नागरिकांसाठी वाहन व्यवस्था असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत पण ह्यामध्ये गॅस वाहतुकीचा प्रश्न नेहमीच समोर येत आहे.

माथेरानचे प्रवेशद्वार दस्तुरीनाका ते बाजारपेठ हे अंतर अडीच किमी आहे आणि गॅस टाक्या वाहनाद्वारे फक्त दस्तुरी नाका येथ पर्यंतच आणल्या जातात व पुढील अंतर घोड्यांच्या पाठीवर गॅस टाक्यांची वाहतूक केली जाते ,गॅस सारख्या ज्वलनशील पदार्थाची वाहतूक सार्वजनिक वाहन व्यवस्थेमधून करण्यास मज्जाव केला जातो पण माथेरान मध्ये घोड्या सारख्या गरीब मुक्या प्राणाच्या पाठीवर एकावेळी चार चार सिलेंडर ची वाहतूक केली जात आहे आणि त्याकडे पर्यावरण प्रेमींचे दुर्लक्ष कसे होते अशी चर्चा येथील नागरिक करीत आहेत.

माथेरानमध्ये सध्या पर्यावरण सनियंत्रण समिती व हरित लवाद कार्यरत आहेत येथे घडणाऱ्या लहानसहान गोष्टींची इत्यंभूत माहिती त्यांना आहे माथेरानमध्ये घडणाऱ्या अनेक कामांमध्ये त्याचा हस्तक्षेप राहिलेला आहे माथेरानचे पर्यटन व येथील वातावरण प्रदूषणमुक्त असावे ह्या करिता ते नेहमीच तत्पर दिसलेले आहेत पण मालवाहतुकीसाठी वापरले जाणाऱ्या घोड्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे त्यामुळे दस्तुरी नाका येथील शासनाच्या एमपी ९३ ह्या भूखंडावर अतिक्रमण तर होत आहेच पण घोड्यांच्या मालमूत्रामुळे प्रदूषणपन वाढत आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे घोड्यांच्या पाठीवर गॅसची वाहतूक होत असल्याने ह्या मुक्याप्राण्यांच्या जीवास ही धोका आहे पण त्यांना वाचा नसल्याने त्यांची व्यथा शासन दरबारी पोहचत तर नाहीच पण पर्यावरण प्रेमी ही त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे वर्षोनुवर्षे सुरू असलेली ह्या घोड्यांच्या पिळवणुकीतू ह्या घोड्यांची सुटका होणार का ? ह्या करिता माथेरान करांनी आवाज उठविला आहे पण त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.

ह्या मुक्या प्राण्यांना जीवदान मिळावे ह्या करिता माथेरान कर मालवाहतुकीसाठी वाहनास परवानगी मिळावी ह्या करिता शासन दरबारी पाठपुरावा करीत आहेत पण शासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने ह्या घोड्यांना अजून किती दिवस ही गुलामगिरी करावी लागणार आहे.हे म प्रश्न गुलदस्त्यातचआहे.

माथेरान शहरात रोज गॅस टाक्यांची वाहतूक केली जाते परंतु ही वाहतूक दुपार नंतर केली जाते त्या मुळे महिला वर्गाची मोठ्या प्रमाणात गैर सोय तसेच स्थानिकांना गॅस टाक्या येत तो पर्यंत तासन तास ताटकळत उभे रहावे लागते. आज जग खूप प्रगतशील दिशेने वाट चाल करीत आहे परंतु ब्रिटिशांच्या या जाचक नियमांनाचा त्रास माथेरानकरांना भोगावा लागत आहे.ह्या जाचक अटी मधून माथेरानकरांची कधी सुटका होईल ह्या कडे माथेरानकरांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page