माथेरान मध्ये नियमांचे पालन करत साध्या पध्दतीने गणरायाचे आगमन…

0
58

दत्ता शिंदे :-

दर वर्षी मोठ्या धूम धडाक्यात ढोल ताशा व मृदुंगाच्या तालात गणरायाचे आगमन होत असते.परंतु ह्या वर्षी कोरोनाच्या महामारीत प्रत्येक सणालाही कोरोनाचा फटका बसला आहे.दर वर्षी प्रत्येकाच्या घरी नातेवाईकांनी घर भरलेले असायचे.घरात मंडपिला साजेल अशी सजावट असायची विजेच्या रोषणाईने घर उजळून निघायचे पण ह्या वर्षी बहुतांश घरी साजेल अशी आरास करण्यात आली आहे.

कोणाच्याही घरी नातेवाईकांची हजेरी नाही.काही नातेवाईक तर कोरोनाने दुरावले देखील.त्याच प्रमाणे अगदी घरच्याच मंडळीने आरती घेयाची. जणू काही कोरोनाने सर्वांना नियम लावून दिले आहेत.


वर्षानु वर्ष गावा गावात लाऊडस्पीकर चा आवाज तर शहरात डी.जे.धडकन असायची रात्री च्या वेळेत सुगम भजनाचा रंग असायचा तर खेडोपाडी स्त्रीया घागरघुमूदे अशा प्रकारच्या नाच गाण्यांनी रंगून जायच्या पण सर्व काही ह्या वर्षी तरी कोरोनाने सर्वांना थांबवलं आहे.अशीच परिस्थिती सर्वत्र माथेरान च्या प्रत्येक विभागात पाहण्यास मिळत आहे.