if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
दत्ता शिंदे … माथेरान
भारतीय संविधान दिनानिमित्त माथेरान नगरपरिषदेच्या कार्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.या निमित्ताने भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.
या संविधानातील उद्देशाप्रमाणे सर्वांनीआपले आचरण ठेवणे आवश्यक असल्याचे मत प्रेरणा सावंत यांनी स्पष्ट केले.
कार्यतत्पर मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांनी संविधान उद्देशिकेची फोटो फ्रेम नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांना भेट दिली. यावेळी माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, श्रमिक रिक्षा संघटनेचे सचिव सुनील शिंदे, माजी शिक्षण सभापती,नगरसेवक नरेश काळे,नगरपरिषदेचे कार्यालय अधिक्षक रणजित कांबळे,धनगर समाजाचे अध्यक्ष राकेश कोकळे, अमोल चौगुले यांसह नगरपरिषदेचे कर्मचारी वृंद, नागरीक उपस्थित होते.