माथेरान मध्ये लसीकरणास सुरवात जेष्ठ नागरिकांन मध्ये समाधान..

0
60

दत्ता शिंदे । माथेरान ।

माथेरानमधील शासकीय रुग्णालयात जेष्ठांसाठी आजपासून लसीकरणास माथेरानच्या नगराध्यक्षा सौ प्रेरणा सावंत यांच्या अथक प्रयत्नामुळे सुरवात करण्यात आली. माथेरानमधील जेष्ठ नागरिकांसाठी लसीकरणाची सुरवात केव्हा होणार ह्याची सर्वच जण वाट पाहत होते.

माथेरान हे पर्यटनस्थळ असल्याने येथे देशातील विविध ठिकाणाहून पर्यटक येत असतात त्यांचा थेट संबंध येथील नागरिकांबरोबर येत असतो त्यामुळे येथील नागरिक माथेरानमध्ये लसीकरण सुरू व्हावे अशी मागणी करीत होते ह्यापूर्वी लसीकरणास सुरवात होताच पहिल्या टप्प्यात येथील पालिका कर्मचाऱ्यांना कर्जत येथील शासकीय रुग्णालयात जाऊन लस घ्यावी लागत होती त्यानुसार पहिली लस घेण्याचा मान वरिष्ठ लिपिक श्री नरेंद्र धनावडे याना मिळाला होता पण वरिष्ठ नागरिकांना कर्जत येथे जाऊन लस घेणे शक्य नसल्याने माथेरान मधेच लसीकरण सुरू व्हावे अशी मागणी माथेरानमधून होत होती.

माथेरानच्या नगराध्यक्षा सौ प्रेरणा सावंत यांनी माथेरान शासकीय रुग्णालयास लस प्राप्त व्हावी ह्यासाठी प्रयत्न केले लसीकरणास शासनाने अनुकूलता दाखवताच येथील रुग्णालयातील वैदकीय अधिकाऱ्यांना लसीकरणाचे प्रशिक्षण देऊन आज प्रत्यक्ष लसीकरणास येथील पालिका रुग्णालयात आजपासून सुरवात करण्यात आली रोज टप्प्याटप्प्याने जेष्ठ नागरिकांना लस देण्यात येणार आहे.

माथेरानमध्ये लसीकरणास सुरवात व्हावी अशी मागणी माथेरान मनसे शाखेनेही केली होती तर लसीकरणास जाणाऱ्या जेष्ठ नागरिकांना नगरसेवक शिवाजी शिंदे यांच्याकडून मोफत हातरीक्षा ची सोय करण्यात आली होती तर पालिका प्रशासनानें रुग्णवाहिकेची सोय केल्याने जेष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला होता.