माथेरान मध्ये हाजी अस्लम खान यांच्या स्मरणार्थ मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन..

0
46

माथेरान- दत्ता शिंदे

माथेरान सारख्या दुर्गम भागात नागरिकांना वेळोवेळी आजारांच्या समस्या उद्भवल्यावर सर्वसामान्य गोरगरिबांना खूपच खर्चिक बाब असते. यासाठी येथील मुस्लिम समाजाचे दिवंगत सदस्य कै. हाजी अस्लम खान यांच्या स्मरणार्थ त्यांचा मुलगा अजहर खान यांनी मैत्री स्पोर्ट्स माथेरान यांच्या आयोजनाने मोफत आरोग्य शिबिराचा स्तुत्य उपक्रम दि.११ रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत वीर हुतात्मा भाई कोतवाल विद्या मंदिराच्या प्रांगणात हाती घेतला त्यास नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे.


या भव्य कार्यक्रमाचे उद्घाटन माथेरानच्या उत्तम प्रशासक विद्यमान नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर,शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी, नगरसेवक चंद्रकांत जाधव, नरेश काळे,शकील पटेल,राकेश चौधरी,माजी नगरसेवक प्रकाश सुतार, कुलदीप जाधव,शिक्षण सभापती प्रतिभा घावरे,सोनम दाभेकर, ज्योती सोनावळे,सुषमा जाधव यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.


भिवंडी येथील सुप्रसिद्ध वैद्यकीय अधिका-यांनी रुग्णांची उत्तम प्रकारे तपासणी करून मोफत औषधे दिली आहेत. यामध्ये सांधेदुखी, कंबर दुखी, दमा, डायबेटीस तसेच मुतखडा वर सुध्दा औषधे दिली आहेत.विशेष म्हणजे मैत्री स्पोर्ट्स ने आयोजित केलेल्या या स्तुत्य उपक्रमात माथेरान मधील तरुणाई व्यसनाच्या अधीन जात असल्याने या युवा पिढीला विडी, तंबाखू, सिगारेट, दारू, गुटखा यासारख्या संभाव्य धोक्यातून बाहेर काढण्यासाठी व्यसनमुक्ती करण्यासाठी या व्यसनांवर देखील औषधे दिली आहेत.

जवळपास तीनशेहून अधिक जणांनी या स्तुत्य उपक्रमाचा लाभ घेतला आहे.या कार्यक्रमाची पाहणी करण्यासाठी नगरपरिषदेचे गटनेते तथा बांधकाम सभापती प्रसाद सावंत यांनी आपल्या सहका-यांसोबत हजेरी लावली.यावेळी सामाजिक कार्यकर्ते नितीन विश्वनाथ सावंत,अमोल सपकाळ, उमेश सावंत,अमोल चौगुले, समीर पन्हाळकर, अजमुद्दीन नालबंद ,नरेश साबळे,बाळू दाभेकर,तुषार बिरामणे आदी उपस्थित होते.


हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अझरुद्दीन खान यांच्या सह मैत्री स्पोर्ट्सचे किरण पेमारे, नीरज यादव, सागर जोशी, मयूर कदम, केदार सावंत, परेश सुर्वे, सचिन भस्मा, विशाल परबवैभव परब, श्रीलेश कासुरडे, अनिकेत मोरे, यांनी परिश्रम घेतले.