if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
माथेरान :-दत्ता शिंदे
एस.टी.महामंडळाने कर्जत माथेरान मिनी बस सेवा आज पासून चालू करून माथेरानकरांना दिलासा दिला आहे.लॉकडाऊन झाल्या पासून मिनीबस सेवा सुरक्षीतेच्या करणास्थव बंद ठेवण्यात आली होती.माथेरान हे पर्यटन असल्याने येथे मिनिट्रेन व नेरळ माथेरान खाजगी टॅक्सी सेवा चालू होती.
परंतु मार्च महिन्या पासून सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ह्याही सेवा हळू हळू बंद झाल्या परंतु येथील स्थानिकांना दवाखान्या साठी किंवा काही महत्वाच्या कामा साठी कर्जत अथवा नेरळ येथे जायचे असेल तर खूपच महागाईचे ठरत होते.
त्यातच येथील सर्वच कमाईचे साधन बंद झाल्याने येथील स्थानिक मोठ्या आर्थिक सामन्याला तोंड द्यावे लागत होते.परंतु आता दिवसातून तीन बस फेऱ्या सुरू झाल्याने स्थानिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत होणार आहे.