Wednesday, September 18, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमानवतेचे संरक्षण करणाऱ्या कर्जत पोलीस दलाचे राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षातर्फे रक्षाबंधन !

मानवतेचे संरक्षण करणाऱ्या कर्जत पोलीस दलाचे राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षातर्फे रक्षाबंधन !

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
” सदरक्षणाय खलनिग्रणाय ” त्या घोषवाक्य प्रमाणे चोवीस तास कर्तव्य बजावत असणाऱ्या आपल्या पोलिस बांधवांना एकही सण साजरा करता येत नाही.समाजासाठी अत्यंत आवश्यक पण काही अंशी सणासुदीच्या दिवशी समाजापासून उपेक्षित राहिलेला हा घटक,गणपती – दिवाळी – दसरा – या सणाच्या दिवशीही नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीसबांधवांना कष्ट करावे लागतात.

नोकरीसाठी मूळ गावापासून दूर, सततच्या बदल्या, वेगवेगळ्या गुन्ह्यांचा तपास यामुळे बहिणीसोबत रक्षाबंधनाचा सणही त्यांना साजरा करता येत नाही.पोलीस बांधवांच्या या हक्काची, कर्तव्याची जाणीव आम्हा महिलावर्गाला आहे.म्हणूनच कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस कडून आज कर्जत शहरातील पोलीस ठाण्यातील पोलीस दलातील अधिकारीवर्ग व कर्मचारी वर्गाला तसेच अग्निशमन दलातील जवानांना राखी बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी पोलीस दलातील उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण भोर, आणि त्यांचे सहकारी पोलीस जवान तसेच अग्निशमन दलातील अधीकारी प्रदीप हिरे तसेच त्यांचे सहकारी, यांना रक्षाबंधन करण्यात आले.


यावेळी कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रंजना धुळे, शहराध्यक्षा पुष्पाताई दगडे, कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्षा उज्वलाताई हजारे,कर्जत नगर परिषदेचे गटनेते शरद लाड, नगरसेविका सुवर्णाताई निलधे, भारतीताई पालकर बीडच्या सरपंच प्रभावतीताई लोभी, कोंडीवडेच्या सरपंच भारतीताई शिंदे, उकरूळच्या सरपंच वंदनाताई थोरवे, नांदगावच्या सरपंच दिपीका जंगले, बोरिवलीच्या सरपंच वृषाली क्षीरसागर, दामतच्या उपसरपंच नयनाताई आखाडे, वदपच्या उपसरपंच मनीषा पाटील, मीनल धुळे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page