मानव संरक्षण समितीचे सचिव अनिल शेडगे यांच्या वाढदिवसाच्या सॅनिटायझर आणि मास्क वाटप…

0
71

खोपोली (दत्तात्रय शेडगे)मानव संरक्षण समितीचे खोपोली शहर सचिव अनिल शेडगे यांच्या वाढदिवसाानिमित्त खोपोली पोलीस स्टेशनला मास्क आणि सॅनिटायझर वाटप करण्यात आले तर प्रज्ञा नगर मध्ये नागरिकांना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

कोरोना काळात मानव संरक्षण समितीच्या वतीने वतीने गोर गरीब गरजूंना वेळोवेळी मदत करण्यात येते ,त्याच प्रमाणे आजही खोपोली पोलीस स्टेशन ला मास्क सॅनिटायझर आणि बिस्कीट वाटप करण्यात आले.

तर खोपोलितील प्रज्ञा नगर नागरिकांना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करून एक आगळावेगळा उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली यावेळी मानव संरक्षण समितीच्या खालापूर तालुका जनसंपर्क अधिकारी श्रीमती सुखदा सुरेंद्र बने, खालापूर तालुका अध्यक्ष कुंदा सीताराम वजरकर, कायदेशीर सल्लागार ऍड सुजाता सचिन परदेशी खोपोली शहर सचिव अनिल शेडगे आदी उपस्थित होते.