मानव संरक्षण समितीच्या वतीने वृद्धाश्रमात सामान वाटप..

0
37

खोपोली( दत्तात्रय शेडगे)
15 ऑगस्ट रोजी स्वतंत्र दिनाचे औचित्य साधत मानव संरक्षण समिती खालापूर व खोपोली यांच्या वतीने हॅप्पी फ्लॉक वृद्धाश्रम कर्जत येथे जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आल्या.

मानव संरक्षण समितीच्या वतीने वेळोवेळी गोर गरीब गरजूंना मदत करण्यात येते त्याचप्रमाणे आजही त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत कर्जत येथील हॅप्पी फ्लॉक वृद्धाश्रमात जीवनावश्यक वस्तुसह खाण्याचे सामान वाटप करण्यात आले.

यावेळीं मानव संरक्षण समितीच्या खालापूर तालुका अध्यक्ष कुंदा सीताराम वजरकर,खालापूर तालुका जनसंपर्क अधिकारी सुखदा सुरेंद्र बने, कायदेशीर सल्लागार खालापूर तालुका ऍड सुजाता सचिन परदेशी, खोपोली शहर ऍड तेजश्री करंजकर, मेडिकल सल्लागार,कोमल सूर्यकांत पेडणेकर, अश्विनी अनिल नाईक आदी उपस्थित होते.