Thursday, May 30, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमानव सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने कर्जत रेल्वे स्थानकावर अन्न दान वाटप !

मानव सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने कर्जत रेल्वे स्थानकावर अन्न दान वाटप !

अध्यक्षा सौ.सविता दिपक जगताप यांचा पुढाकार…

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुक्यात सामाजिक उपक्रमात नेहमीच अग्रेसर राहून गोरगरीब व गरजू नागरिकांसाठी झटणारी मानव सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने नेहमीच विविध उपक्रम राबविले जातात . यावेळी दरवर्षीप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनी दादर चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून पुन्हा परतीच्या वाटेकडे जात असलेल्या बहुजन समाजाला व इतर समाजातील गोरगरीब व गरजूंना कर्जत रेल्वे स्थानकावर मानव सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आज अन्नदानाचे वाटप करण्यात आले.
यावेळी अनेक आंबेडकरी अनुयायांनी व प्रवाशांनी या अल्पोपहाराचा लाभ घेतला.मानव सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ. सविता दिपक जगताप या नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत अल्पदरात कॉम्प्युटर क्लास ,शिवण क्लास , रक्तदान शिबिर , आरोग्य शिबीर , १४ एप्रिल रोजी खाऊ वाटप असे उपक्रम राबवित असतात. दरवर्षी चैत्यभूमी दादर येथून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून परतणाऱ्या बहुजन व प्रवाशांना तसेच इतर समाज वर्गाला कर्जत रेल्वे स्थानकावर अन्नदान हा कार्यक्रम करतात.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ. सविता दिपक जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. कांचन धारगावे , प्रभु रायभोळे , ईश्वर भालेराव , अनिकेत घोरपडे, सुभाष जाधव, शेषराव घोरपडे, गौतम हिरे , श्याम लोखंडे , चंद्रकांत शेंडगे आदी सभासद मंडळ उपस्थित राहून सर्वांना अन्नदान वाटप केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page