तळेगाव : तळेगाव दाभाडे येथील मायमर हॉस्पिटल प्रशासनाच्या भोंगळ कारभारा विरोधात मावळ तालुका काँग्रेस आय पक्षाच्या वतीने उग्र आंदोलनाचा इशारा.मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे खूप वर्षांपासून कार्यरत असणारे मायमर ( जनरल हॉस्पिटल ) गेल्या काही दिवसांत हाॅस्पिटल प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे अनेक प्रकारच्या तक्रारी समोर येत आहेत.
कोरोनामुळे निधन झाल्याने रुग्णांचा मृतदेह बिलाअभावी नातेवाईकांच्या ताब्यात न देणे, त्याच बरोबर रुग्णांच्या नातेवाईकांना अरेरावीची भाषा वापरणे, योग्य प्रकारे उपचार न देणे, कोव्हिड १९ रुग्णांना अधिकचे बिल देणे, नुकतीच एका रुग्णाने हॉस्पिटलमध्ये सोयी सुविधा उपलब्ध होत नसल्याने आत्महत्या केल्याची घटना घडली असून अशा अनेक प्रकारच्या तक्रारी समोर येत असल्याने मावळ तालुका काँग्रेस आय कमिटीच्या वतीने हाॅस्पिटल प्रशासनाच्या विरोधात मावळ तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, मावळ तालुका युवक अध्यक्ष विलास मालपोटे, वडगाव शहराध्यक्ष गोरख ढोरे, नगराध्यक्ष मयुर ढोरे, संपत दाभाडे, विलास विकारी, गणपत भानुसघरे, महेश मालपोटे, गोरख असवले, सुधीर भोंगाडे, काळूराम असवले, सौरभ ढोरे आदी उपस्थित होते.
सदरचे हाॅस्पिटल हे राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने ताब्यात घ्यावे. त्याचप्रमाणे अशा दुर्दैवी घटना घडत असल्याने व शासनाने योग्य तो निर्णय लवकरात लवकर न घेतल्यास मावळ तालुका काँग्रेस आय पक्षाच्या वतीने हाॅस्पिटल विरोधात उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.