Monday, July 15, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमाय भगिनींच्या "अटकेपार गर्दीने " शिवसेना प्रणित उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत...

माय भगिनींच्या “अटकेपार गर्दीने ” शिवसेना प्रणित उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांचा ” हळदी कुंकू ” समारंभ जल्लोषात !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) हिंदू -हदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी घडलेली शिवसेना आजही जिवंत आहे , याचा प्रत्यक्ष दर्शन कर्जतमध्ये शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे प्रणित उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत यांनी कर्जतच्या पोलीस मैदानावर माय भगिनिंसाठी ” हळदी कुंकू ” समारंभ व ” खेळ मांडियेला ” या कार्यक्रमाचे आयोजन केले होते . महाराष्ट्राचे प्रसिद्ध ” भाऊजी ” तथा शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमास भाग घेवून खेळात ” हम भी कूछ कम नहीं ” असे दाखविण्यास अटकेपार गर्दीचा उच्चांक यामुळे हा कार्यक्रम सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला . संपूर्ण कर्जत नगर परिषद हद्दीत ” महिलाच – महिला ” दिसत होत्या . रॉयल गार्डन , श्रीराम पुल , आमराई , म्हाडा कॉलनी , पोलीस मैदान बाहेरील परिसर , डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक , नगर परिषद परिसर , बाजारपेठ , कोतवाल नगर , कर्जत रेल्वे परिसर , इमारतींवर , जिथे बघाल तिथे महिलाच – महिला दिसत होत्या . पोलीस मैदानावर ” अटकेपार गर्दी झाल्याने नाईलाजास्तव महिलांना बाहेरच उभे रहावे लागले . शिवसेनेवर तसेच उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत व भाऊजी आदेश बांदेकर यांच्या ” अतूट प्रेमाचं – मायेचं नातं ” यातून दिसून आले . अखेर भावनाविवश होत , सद्गदित झालेले नितीन दादा यांनी आलेल्या माय भगिनींची दिलगिरी व्यक्त करत , सर्वाँना व्यासपीठावर नतमस्तक होत डोकं टेकवले . आलेल्या सर्व माय भगिनींना नाश्ता – जेवण – पाणी याची सोय केली होती , तर अत्यावश्यक सेवा म्हणून अँब्युलन्स , डॉक्टरांची सोय करण्यात आली होती.

शिवसेनेचा शिवसैनिक व महिला आघाडी खरोखरच मुजरा करण्यास मानाच्या का ? हे आजच्या गर्दीवरून दिसून आले . जवळ जवळ २५ हजार महिला येथे आल्याने आयोजकांनी यावर व्यवस्थित मार्गदर्शन करून बसण्याची सोय केली , व सर्वांना घरपोच ” मायेची साडी ” देण्यात येईल असे सांगण्यात आले , तर हा खेळ मांडियेला कार्यक्रम मोठ्या उत्साहात रात्री साडेदहा वाजले तरी सुरू होता . अनेक महिलांनी या खेळात उत्स्फूर्त पणे भाग घेत आनंदोत्सव साजरा केला . अनेकांना पैठणी तर अनेक भेट वस्तू देण्यात आल्या . अत्यंत अटीतटीच्या खेळात सौ. सुवर्णा अनिल घोसाळकर या नडोदे वाडी – ता. खालापूर या भगिनिने अंतिम विजेते पद पटकावून इलेक्ट्रिक स्कुटीची मानकरी ठरली.

मात्र महिलांच्या झालेल्या ” अटकेपार गर्दीने ” राजकीय पटलावर खूप मोठी उलथापालथ झाली असून भविष्यात विधानसभा निवडणुकीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत हे उमेदवार असल्यास शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक व कडव्या महिला आघाडी रणरागिणी यांच्या जोरावर नक्कीच विजयश्री खेचून घेणार ? यांत शंकाच नसेल . पण उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांनी ” सौ सोनार की , एक लोहार की ” असा ” राजकीय हातोडा ” मारला असून झालेल्या अभूतपूर्व गर्दी , ऐतिहासिक गर्दीचा उच्चांक मोडून , ” अटकेपार गर्दी ” दाखवून दिली , म्हणूनच या निमित्ताने , ” नितीन दादा सावंत , तुमचा नादच नाय ” अशी चर्चा मात्र कर्जत खालापूर मतदार संघात होत आहे . विशेष म्हणजे शिवसेनेचे सचिव व सर्वांचे भाऊजी देखील हि अटकेपार गर्दी बघून थक्क झाले .यावेळी शिवसेनेचे बबन दादा पाटील , जिल्हाप्रमुख मनोहर भोईर , उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत , लोकसभेचे उमेदवार पाटील , जिल्हा महिला संघटीका तथा नगराध्यक्षा सौ. सुवर्णा जोशी , राजिपचे मा. अध्यक्ष सुरेश दादा टोकरे , त्याचप्रमाणे कर्जत खालापूर मतदार संघातील सर्व महिला महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
- Advertisment -

You cannot copy content of this page