Friday, October 25, 2024
Homeपुणेलोणावळामार्च अखेर लोणावळा नगरपरिषदेने 28 कोटी 70 लाखांचा कर केला वसुल…

मार्च अखेर लोणावळा नगरपरिषदेने 28 कोटी 70 लाखांचा कर केला वसुल…

लोणावळा : लोणावळा नगर परिषदेने कर वसुलीसाठी मोठी मोहीम राबवून 31 मार्च 2024 पर्यंत अखेर पर्यंत थकबाकीदारांकडून 28 कोटी 70 लाख रुपयांची वसूली केली आहे. लोणावळा शहरात 20977 इतक्या मालमत्ताची नोंदणी नगर परिषदेकडे झालेली आहे.
मालमत्ता करापोटी 38 कोटी 15 लाख 41 हजार रूपये वसुली करावयाची होती. त्यापैकी, आत्तापर्यंत 28 कोटी 70 लाख रूपये मालमत्ता करापोटी तर पाणीपट्टी कराच्या थकीत 9 कोटी 93 लाख रुपयांपैकी 8 कोटी 82 लाख रूपये वसुल केले आहेत.
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अशोक साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वसुली पथकाने 21 मालमत्तांवर जप्तीची कारवाई देखील केली आहे. कर भरण्यासाठी मिळकतदारांना अनेक वेळा आवाहन केले आहे. नोटिसादेखील पाठविल्या. परंतु, काहींनी कराची रक्कम भरली नाही. अशा मिळकतदारांच्या मिळकती जप्त करण्यात आल्या आहेत व नळ कनेक्शन बंद केले आहेत.
मुख्याधिकारी अशोक साबळे – जप्तीची कारवाई व दंडात्मक व्याज टाळण्यासाठी थकबाकीदारांनी कराची रक्कम त्वरीत भरावी, असे आवाहन नगर परिषदेच्या वतीने मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी केले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page