![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(!empty($image5)); {?>
![]()
} ?>
लोणावळा (प्रतिनिधी): मळवली ते कामशेत दरम्यान रेल्वे मार्गावर एका अनोळखी वृद्धाचा रेल्वे मालगाडीच्या धडकेने मृत्यू झाल्याची घटना, दि. 7 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास मळवली ते कामशेत दरम्यान घडली. एक अनोळखी इसम (वय अंदाजे 75 वर्षे ) हा धावती मालगाडी एम एस टी बी सी सी एच ची धडक बसून डोक्याला झालेल्या गंभीर दुखापती मुळे मृत्यू पावला आहे.
अंगाने सडपातळ उंची 5 फूट, रंगाने निमगोरा, चेहरा उभट, दात वरचे दोन शाबूत, सरळ नाक, पांढरी दाढी, अर्धवट टक्कल असे त्याचे साधारण वर्णन आहे, मयताच्या अंगात नेव्ही ब्लू रंगाचा हाफ स्वेटर, पांढऱ्या रंगाचा फुल शर्ट, काळया रंगांची नाईट पॅन्ट आणि चॉकलेटी रंगांची अंडर वेअर परिधान केलेली आहे.
तरी वरील वर्णन असलेल्या इसमाचे कोणी नातेवाईक, मित्र, शेजारी वारस यांना ओळख पटल्यास त्यांनी लोणावळा रेल्वे पोलीस यांच्याशी संपर्क करावा असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात जीआरपी पोलीस एस ई सावंत यांनी आवाहन केले आहे.