Monday, July 22, 2024
Homeपुणेमावळमावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांची बदली तर विक्रम देशमुख हे मावळचे नवे...

मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांची बदली तर विक्रम देशमुख हे मावळचे नवे तहसीलदार…

मावळ (प्रतिनिधी):मावळ तालुक्याचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांची बदली झाल्याची माहिती समोर येत आहे. राज्यातील तहसीलदार संवर्गातील एकूण 32 जणांच्या बदल्या करण्यात आल्याचे आदेश पत्रक शासनाच्या महसूल आणि वन विभागाकडून काढण्यात आले आहे.
यात मावळ तालुक्याचे सध्याचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांची थेट गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुका तहसीलदार पदी बदली झाली आहे.तहसीलदार मधुसूदन बर्गे हे कर्तव्यदक्ष आणि तितकेच वादातीत अधिकारी म्हणून परिचित होते. त्यांनी कोरोना लॉकडाऊन काळात चांगले काम केले होते. तसेच तालुक्यात कुठेही आंदोलन मोर्चे असल्यास तहसीलदार बर्गे स्वतः तिथे जाऊन आंदोलकांशी चर्चा विनिमय करत असत. काही दिवसांपूर्वी सोमाटणे टोलनाका बद्दल त्यांनी स्पष्ट भुमिका घेतली होती. मात्र अनेक राजकीय नेत्यांकडून आरोपांच्या फैरी त्यांच्यावर सतत झडत राहिल्या. तहसीलदार बर्गे यांची तडकाफडकी बदली झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
मधुसूदन बर्गे यांची बदली होत असल्याने त्यांच्या जागी कोण येणार, याची सर्वत्र चर्चा होत असताना विक्रम देशमुख हे मावळचे नवे तहसीलदार असतील असे समजत आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page