Sunday, June 23, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमावळच्या भावी खासदार माधवीताई नरेश जोशी आयोजित रायगड केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन...

मावळच्या भावी खासदार माधवीताई नरेश जोशी आयोजित रायगड केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन !

श्रीमंत छत्रपती उदयन राजे महाराज यांची चौक येथे उपस्थिती..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) गेल्या एक महिन्यापासून डंका पिटवणाऱ्या मावळ लोकसभा मतदार संघाच्या भावी खासदार म्हणून उदयास येणाऱ्या माधवी ताई नरेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली व छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज श्रीमंत छत्रपती उदयन राजे महाराज (सातारा) खासदार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरुष व महिलांसाठी ” भावी खासदार केसरी कुस्ती स्पर्धाचे ” आयोजन मंगळवार दि. ६ जून २०२३ रोजी दुपारी ४ वा. स्थळ – हातनोली येथील भव्य मैदान, चौक फाटा, ता. खालापूर, जि. रायगड येथे करण्यात आले आहे . या कुस्ती स्पर्धेकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे . या कुस्तीसाठी चांदीची गदा व रोख रक्कम तसेच अनेक आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

या कुस्ती स्पर्धेची जय्यत तयारी झाली असून यास पै. मारुती आडकर – (ओलंपिकवीर) , पै. काकासाहेब पवार -(अर्जुनवीर), पै. राहुल आवरे , पै. नरसिंग यादव , पै.विजय चौधरी (डीवायएसपी) , पै. अमोल बुचडे , पै. अमोल बराटे , पै. सचिन घोटकुळे , पै. खंडू वाळुंज , रायगड जिल्हा कुस्तीगीर संघ – मा. आमदार बाळाराम पाटील (अध्यक्ष) ,श्री. सुभाष घासे , श्री. मारुती आडकर – सरचिटणीस , बळीराम पाटील , जयेंद्र भगत, सुनील पाटील , भगवान धुळे ,नंदकुमार म्हात्रे, हरीचंद्र शिंदे , संतोष गेट वैभव सकपाळ व आयोजक – सौ. माधवीताई नरेश जोशी युवा प्रतिष्ठान – यांची संपूर्ण टीम आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहे.

तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत छत्रपती उदयन राजे भोसले (खासदार सातारा) , मा. श्री. अजितदादा पवार (माजी उपमुख्यमंत्री), सुनीलजी तटकरे (खासदार रायगड) , महेंद्रजी थोरवे (आमदार कर्जत खालापूर), सुनील अण्णा शेळके (आमदार मावळ) , मनोहरशेठ भोईर (माजी आमदार उरण), राजूशेठ पाटील (आमदार, कल्याण) , सुरेशदादा टोकरे (संघटन कर्जत तालुकाध्यक्ष) , मा. मोतीरामशेठ ठोंबरे (जिल्हा परिषद सदस्य) , मंगेश म्हसकर (अध्यक्ष भारतीय जनता पार्टी) , सुहासजी खामकर (मिस्टर वर्ल्ड, मिस्टर एशिया, मिस्टर इंडिया) जितेंद्र पाटील (म.न.से. जिल्हा अध्यक्ष रायगड) , सौ. उमाताई मुंढे (सदस्या रा. जि. परिषद) , पद्मा सुरेश पाटील (ग्रा.पं. सदस्य) मा. शंभर. वृषाली पाटील (अध्यक्ष खालापूर) ,बळीराम पाटील (अध्यक्ष पनवेल तालुका कुस्तीगीर संघ) मा. जयेंद्र भगत (अध्यक्ष अलिबाग तालुका कुस्तीगीर संघ – सुनील पाटील (अध्यक्ष खालापुर तालुका कुस्तीगीर संघ), भगवान धुळे (अध्यक्ष कर्जत तालुका कुस्तीगीर संघ) , नंदकुमार म्हात्रे (अध्यक्ष रोहा तालुका कुस्तीगीर संघ) , हरिचंद्र शिंदे (अध्यक्ष- पेण तालुका कुस्तीगीर संघ) , संतोष फाटक (अध्यक्ष सुधागड तालुका कुस्तीगीर संघ) , वैभव सकपाळ (अध्यक्ष महाड तालुका कुस्तीगीर संघ) ,आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.

त्याचप्रमाणे पत्रकार बंधू देखील उपस्थित रहाणार असून कुस्ती शौकीन यांना तर हि स्पर्धा पर्वणीच ठरणार आहे . तरी मोठ्या संख्येने या कुस्ती स्पर्धेस उपस्थित रहावे , असे आवाहन मावळ लोकसभा मतदार संघाच्या भावी खासदार म्हणून उदयास येणाऱ्या सौ .माधवी ताई नरेश जोशी यांनी केले आहे .
- Advertisment -

You cannot copy content of this page