भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) निसर्गाने दिलेल्या जिद्द – चिकाटी – मेहनत – माणुसकी – मदत करण्याची आवड या देणगी रुपी गुणांच्या जोडीने संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक्षात राजकीय क्षेत्रात उतरून सर्व नागरिकांना सोई सुविधा व त्यांचे मूलभूत अधिकार मिळावेत म्हणून प्रयत्नशील राहून कुठलेही राजकीय पद नसताना झटणाऱ्या व गेल्या एक महिन्यापासून डंका पिटवणाऱ्या मावळ लोकसभा मतदार संघाच्या ” भावी खासदार ” म्हणून उदयास येणाऱ्या माधवी ताई नरेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली व अनेक तुफान गर्दीत उपस्थित राहिलेल्या मतदार राजांच्या प्रमुख उपस्थितीत पुरुष व महिलांसाठी ” भावी खासदार केसरी कुस्ती स्पर्धाचे ” आयोजन मंगळवार दि. ६ जून २०२३ रोजी दुपारी ४ वा. स्थळ – हातनोली येथील भव्य मैदान, चौक फाटा, ता. खालापूर, जि. रायगड येथे करण्यात आले आहे .
या कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने माधवी ताई नरेश जोशी या भावी खासदार म्हणून मावळ लोकसभा मतदार संघा बरोबरच दिल्लीच्या तख्ता पर्यंत प्रसिद्धीच्या झोतापर्यंत जाऊन पोहचल्या आहेत . मराठ मोळ्या मातीतील खेळांना प्राधान्य देवून कुस्ती पट्टूना प्रोत्साहन देवून राज्य व देश पातळीवर खेळाडू निर्माण करण्याची त्यांच्या या जिद्दीला व ” कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनी ” ठेवलेल्या स्पर्धेला ” न भूतो न भविष्यती ” अशी तुफान झालेल्या गर्दीला सर्वांनीच वाहवा केली . या कुस्तीसाठी चांदीची गदा व रोख रक्कम तसेच अनेक आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती.
या कुस्ती स्पर्धेस रायगड जिल्हा कुस्तीगीर संघ – मा. आमदार बाळाराम पाटील (अध्यक्ष) , मराठी चित्रपट सृष्टीचे सिने स्टार महेश कोठारे , आयोजक – सौ. माधवीताई नरेश जोशी युवा प्रतिष्ठान – यांची संपूर्ण टीम तसेच सुरेशदादा टोकरे ( माजी राजिप अध्यक्ष ) , मा. मोतीरामशेठ ठोंबरे (जिल्हा परिषद सदस्य) , जितेंद्र पाटील (म.न.से. जिल्हा अध्यक्ष रायगड) , सुधीर शेठ ठोंबरे , भगवान धुळे (अध्यक्ष कर्जत तालुका कुस्तीगीर संघ) , रमाकांत जाधव , योगेश पोथरकर , त्याचप्रमाणे अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते , या सर्वांना सन्मानित करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज व भारत भूमी स्वातंत्र्य होण्याच्या महासंग्रामात आहुती देणाऱ्या वीरांच्या भूमीत जन्म घेतलेले नरेश जोशी यांच्या धर्म पत्नी असलेल्या माधवी ताई यांनी मावळ लोकसभा मतदार संघात घेतलेल्या वादळी एन्ट्री मुळे खूपच चर्चेत आल्या आहेत . पायाला भिंगरी लावून सर्व मावळ लोकसभा मतदार संघात कार्यक्रम घेवून त्यांनी मतदार राजांची मने जिंकली आहेत. क्रिकेट सामने , कुस्ती स्पर्धा , आरोग्य शिबीर ,शालेय शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांना मदत , वाढदिवस शुभेच्छा , महापुरुषांच्या जयंती कार्यक्रम , अश्या विविध क्षेत्रात उपस्थिती दर्शवून त्या पुढे जात असल्याचे दिसून येत आहेत . त्यांच्या या कार्यास सिनेस्टार महेश कोठारे सर , मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र दादा पाटील , मा. राजीप अध्यक्ष सुरेश दादा टोकरे यांनी शुभेच्छा दिल्या.
या कुस्ती स्पर्धेचे नियोजन देखील त्यांनी उल्लेखनीय असेच केले होते . यावेळी छत्रपती शिवाजी महाराज , घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर , राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कुस्ती आखाड्याचे नारळ वाढवून उद्घाटन मान्यवरांच्या व भावी खासदार माधवी ताई जोशी यांच्या हस्ते करून कुस्तीस सुरुवात झाली . लहान मुले – मुली तर राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेस महाराष्ट्रातील तसेच रायगड जिल्हा व कर्जत तालुक्यातील नामांकित कुस्ती पट्टू उपस्थित होते . यावेळी विशेष आकर्षण ठरलेली उप महाराष्ट्र केसरी कुस्ती किरण भगत व योगेश पवार यांच्यात झालेल्या कुस्तीत किरण भगत यांनी कुस्ती चितपट करून जिंकली . तर कर्जत मधील अनेक कुस्ती पट्टूंची कुस्ती वाखानण्या जोगे होती . या सर्वांना रोख बक्षीस व आकर्षक भेट देवून गौरविण्यात आले . यावेळी सुमधुर आवाजात संतोष चौधरी , समीर सोमणे यांनी कुस्तीचे आँखो देखा हाल सांगितला.