मावळमधील धनगर समाज आजही दुर्लक्षित, धनगर समाज काढतोय अंधारात दिवस..

0
209

लोकप्रतिनिधीना पडलाय विसर,मूलभूत सुविधांपासून आजही वंचित..

प्रतिनिधी ( दत्तात्रय शेडगे)
मावळ तालुक्यातील अतिदुर्गम भागात राहत असलेल्या पठार या भागात अजूनही कुठल्याही प्रकारची शासकीय सोय पोहोचलेली नाही येथील नागरिकांची गैरसोय असून येथे कुठल्या प्रकारचे आरोग्याची सोय मुलांसाठी ऑनलाइन शिक्षण शिक्षणासाठी वीज उपलब्ध नाही तर येथील विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेणार कसे ऑनलाइन शिक्षण यासाठी कुठल्याही प्रकारची तर नेटवर्कच नाही.

आरोग्याच्या बाबतीत येथे घडलेल्या काही महिन्यापूर्वी शिक्षक भाऊ आखाडे यांचा रात्री झोपेत एक-दीड वाजता काही वर्षा पूर्वी सर्पदंश झाला वेळेवर उपचार न मिळाल्यास मृत्यू झाला या पठारावर रस्ता नसल्याने ग्रामस्थांना एक-दीड तास डोंगर उतरुन गेले व वेळेवर उपचार न मिळाल्यास त्याचा दुर्दैवी अंत झाला येथे सर्पदंशाच्या वारंवार घटना घडत असतात येथील रस्ता नसल्यामुळे घर कामासाठी लागणारे साहित्य एक दिवस डोक्यावर घेऊन चालत उंच डोंगर चढून जावे लागत आहे.

शासन आपल्या दारी संपूर्ण मावळ भर चाललेली योजना अत्यंत सोयीचे आहे परंतु येथे शासन आपल्या दारी येण्यासाठी कुठला रस्ताच नाही तर शासन आपल्या दारी येणार कस ? यअसा नागरिकांचा मोठा प्रश्न आहे त्यासाठी प्रशासनाने लक्ष घालावे आणि येथील नागरिकांसाठी शासकीय सोयी उपलब्ध करून द्यावे येथील समाजाचा राजकीय पुढाऱ्यांनी फक्त निवडणूकी पुरता वापर करून घेतला असून निवडणूका झाल्या की या समाजाकडे कोणताही राजकीय पुढारी किंवा पक्ष लक्ष देत नाहीत.

या पठारावरिल धनगर समाज आजही सुविधांपासून उपेक्षित असून येथे रस्ता वीज पाणी यांच्या मूलभूत सुविधा नसल्याने येथील बांधवाना आजही आपण अश्मयुगात आहेत असे वाटत, एकीकडे सरकार मोठं मोठ्या घोषणा करत आहेत मात्र प्रत्यक्षात त्या पोहविल्या जात नाहीत, त्यामुळे समाजाकडे कोणी लक्ष देईल का असा प्रश्न उपस्थित केला आहे.