Friday, March 24, 2023
Homeक्राईममावळातील कान्हे फाटा येथील एका किराणा व्यावसायिकाचा खून.....

मावळातील कान्हे फाटा येथील एका किराणा व्यावसायिकाचा खून…..

बुधवार दि. (22)रोजी सायंकाळी 6:45 वा. च्या सुमारास मावळातील कान्हे फाटा येथील एका किराणा मालाच्या व्यापाऱ्याचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली, एका दिवसात मावळात हत्येचे दोन प्रकार घडल्याने संपूर्ण मावळात खळबळ उडाली आहे.

वडगाव मावळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेवरचंद कान्हाराम परमार ( वय 56, रा. कान्हे, मावळ ) व्यवसाय किराणा मालाचे व्यापारी, यांचा खून झाला आहे. सदर खून जागेच्या वादातून झाला असून, कान्हे येथील राहणारा सागर सातकर व त्याच्या एका साथीदाराने केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मयत परमार याने 25 वर्षांपूर्वी सागरचे वडील अशोक सातकर यांच्याकडून घर बांधण्याकरिता जागा विकत घेतली व तिथे घर बांधून परमार परिवार राहत होता. मधील काळात अशोक सातकर यांचा मृत्यू झाला.

त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी सागर हा परमार यांच्याकडे गेला आणि आमची जागा तुझ्याकडे जास्त निघत आहे मला त्या जागेचे पैसे पाहिजेत असे बोलू लागला तदनंतर परमार यांनी आपण जागेची मोजणी करू असे सांगितले, मग परमार यांनी जागेची मोजणीही केली त्यावेळी सागर आणि परमार यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली होती.

त्यातच काल बुधवारी सायंकाळी 6:45 वा. च्या सुमारास सागर आणि त्याचा एक साथीदार परमार यांच्याकडे आले व त्या दोघांनी कोयता व धारदार शस्त्राने परमार यांच्यावर हल्ला केला हल्ल्यात परमार हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना ताबडतोब जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले. व तिथे उपचार करण्यापूर्वीच परमार यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले त्यासंदर्भात वडगाव मावळ पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद केला असून, पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करत आहेत….

You cannot copy content of this page