मावळातील कामशेत पवना नगर रोडवर सराईत गुन्हेगारांकडून गांजा जप्त…

0
632

मावळातील कामशेत पवना रोड येथे ग्रामीण पोलिसांकडून छापा मारून 578 किलो 500 ग्रॅम अवैध गांजा हस्तगत करण्यात आला आहे. गुप्त सूत्रांकडून पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार कामशेत येथील संतोष वाळुंज आणि धनाजी जिट्टे हे गांजाचे होलसेल विक्रेते असून त्यांच्याकडे गांजाचा अवैध साठा असल्याचे कळताच.

उपविभागीय पोलीस अधिकारी नवनीत कॉवत यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण पोलीस, कामशेत ग्रामीण पोलीस व एल सी बी यांची एक टिम तयार करून कामशेत पवना नगर येथील माहितीत मिळालेल्या ठिकाणावर धडक कारवाई केली असता आरोपी संतोष वाळुंज आणि धनाजी जिट्टे यांच्या कडून 578 किलो 500 ग्रॅम असा एकूण 86 लाख 77 हजार 500 रु. किमतीचा गांजा साठा हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. सदर कारवाईत आरोपी संतोष वाळुंज फरार झाला असून दुसरा आरोपी धनाजी जिट्टे यास पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे.