Tuesday, October 3, 2023
Homeपुणेमावळमावळातील ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने दहीहंडी साजरी....

मावळातील ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने दहीहंडी साजरी….

कार्ला- मावळ, दी.12 आॅगस्ट 2020( कार्ला प्रतिनिधी गणेश कुंभार) संपुर्ण भारतभर कृष्ण जंयती दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी होत असते.अनेक बाळ गोपाळ दहीहांडी फोडण्यासाठी ऐक महीनाभर सराव करत असात.

परंतु यावर्षी कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने कार्ला परिसरातील पाटण देवले,भाजे,मळवली,वाकसई देवघर,बोरज,सदापूर,शिलाटणे,वेहरगाव ,ताजे,गावांमध्ये गावातील श्रीकृष्ण मंदिरात साध्या पध्दतीने थोड्याच भक्तांच्या उपस्थितीत श्रीकृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.


तसेच कार्ला येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हरिनाम सप्ताह रद्द करण्यात येऊन सोशल डिस्टसिंगचे पालन करत फक्त एक दिवसासाठी ठेवण्यात आला होता. कृष्ण जयंतीच्या दिवशी रात्री बारा वाजता श्रीकृष्ण  जन्मोत्सव  कार्यक्रम संपन्न झाला यावेळी देखील सोशल डिस्टन्स ठेवत पाळणा गीते सादर करण्यात आली.


गोपाळकाल्याच्या दिवशी गावागावातील श्रीकृष्ण भक्तांनी गावातील प्रमुख मंदिरासमोर  पारंपारिक पध्दतीने देव नाचत असतात परंतु कोरोना रोगाच्या प्रादूर्भावामुळे यावर यावर्षी निर्बंध आले होते.मावळ तालुक्यात कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या वर्षी बाळ गोपाळांनी दहीहांडी न फोडन्याचा पर्याय नीवडला होता.

- Advertisment -

You cannot copy content of this page