मावळातील ग्रामीण भागात होळी हा सण अगदी उत्सहात साजरा करण्यात आला…

0
90

लोणावळा : लोणावळा व कार्ला परिसरात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

मागील दोन वर्ष कोरोनामुळे अनेक सार्वजनिक सनांवर निर्बंध होते. त्यानुसार होळी हा सण साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत होता.

यावर्षी मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला व शासनाचे निर्बंध देखील कमी करण्यात आल्याने होळीचा सण अनेक ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला.

वाकसई तुकाराम नगर याठिकाणी होळी हा सण पारंपरिक पद्धतीने लहाना मोठ्यांनी अगदी उत्सहात साजरा केला.

तेथील ग्रामदेवता व परिसरातील मंदिरासमोर ऐरंडाच्या झाडाची फांदी , गवरी , गवत , जळावू लाकडं लावत होळी तयार करण्यात आली तसेच सायंकाळी महिलांनी होळीचे पुजन करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला आणि त्यानंतर होळी प्रज्वलित करुण होळीमध्ये नारळ अर्पण करण्यात आले त्यावेळी लहान मुलांनी हाताने ताटल्या वाजवत बोंब मारत शिमगा साजरा केला.होळीच्या पवित्र अग्निमध्ये माणसाच्या मनातील वाईट विचार, कटुता, समाजातील वाईट प्रथा, रूढी, कोरोना सारखी भयंकर महामारी जळून जाऊदे अशी भावना व्यक्त करत सर्व नागरिक, महिला व लहान्यांनी होळीचे दर्शन घेतले.

त्यांनतर आज धुलीवंदना निमित्त रंगबेरंगी रंगांची उधळण करण्यात आली.