Sunday, June 23, 2024
Homeपुणेमावळमावळातील दहिवली व देवले येथे आज दोन रुग्ण पॉझिटिव्ह..

मावळातील दहिवली व देवले येथे आज दोन रुग्ण पॉझिटिव्ह..

कार्ला- मावळ प्रतिनिधी रोशनी ठाकुर कार्ला प्रतिनिधी गणेश कुंभार) तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढत असून आज पुन्हा कार्ला भागातील दहिवली येथील ३२ वर्षीय पुरुष, तर देवले येथील कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कातील त्याची २७ वर्षीय पत्नी हिचा अहवाल काल दि. 15 रोजी पाॕझिटीव्ह आला होता.


दहिवली येथील पुरुष हा लग्नसमारंभासाठी बाहेर परगावी गेला होता. त्याच्यात लक्षणे आढळ्यास त्याचा swab घेण्यात आला होता.त्यामार्फत काल दि. 15 तो पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल मिळाला आहे. सदर रुग्ण तळेगाव येथे उपचार घेत असून त्याच्या संपर्कात आलेल्या 6 जणांना हाय रिस्क तर 20 जणांना लो रिस्क मध्ये ठेवण्यात आले आहे.त्याचबरोबर देवले येथे पॉझिटिव्ह आढळून आलेल्या महिलेचा पती नांगरगाव येथील कंपनीत कामाला असताना त्याचा रिपोर्ट दोन दिवसापूर्वी पाॕझिटीव्ह आल्याने त्याच्या संपर्कातील त्याच्या पत्नीचा स्वॕब घेतला व तो कालच पाॕझिटीव्ह सांगण्यात आला होता.दहिवली येथील रुग्ण तळेगाव येथे तर देवले येथील महिला लोणावळा या ठिकाणी उपचार घेत आहेत.

तसेच टाकवे (बु )येथे कोरोना रूग्णाच्या संपर्कात आलेल्या आणखी 6 जणांचे स्वॅब हे तपासणी साठी घेण्यात आले होते.त्या 6 जणांचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला असल्याची माहिती कार्ला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डाॅ भारती पोळ, आरोग्य सेवक प्रसाद बिराजदार, चंद्रकांत गवलवाड, शिवाजी चव्हाण यांनी दिली. दहिवली गाव हे सुरक्षतेसाठी कंटेनमेन्ट झोन घोषीत केले आहे. वेहरगाव, भाजे ,शिलाटणे ,टाकवे,देवले, मळवली व आज दहीवली येथे रुग्ण आढळून आल्याने कार्ला गाव हे मधोमध असुन ते सध्या सुरक्षित जरी असले तरी नागरिकांना आणखी काळजी घेण्याची गरज आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page