मावळातील नाणे गावच्या तुषार नाणेकर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम…

0
227
( मावळ प्रतिनिधी : संदीप मोरे )
कामशेत (मावळ ) : दि. 9.मावळातील नाणे गाव मधील युवा नेतृत्व तुषार अंकुश नाणेकर यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना विषाणूच्या संसर्गापासून संरक्षण करण्याकरिता कामशेत पोलीस स्टेशनमधील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना सुरक्षा कीटचे वाटप करण्यात आले.
त्यावेळी कामशेत पोलीस स्टेशनचे निरीक्षक अरविंद चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेखा शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार, पोलीस कॉन्स्टेबल संतोष घोलप, आणि सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना सुरक्षा कीट देण्यात आले. “मदत नव्हे कर्तव्य ” या सामाजिक भावनेतून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दिवस रात्र कार्यरत असणाऱ्या पोलीस बांधवांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
त्यावेळी पुणे जि. पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष तुकाराम नाणेकर, विश्वनाथ तु. नाणेकर, मावळ ता. राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष कामगार नेते किशोर अशोक सातकर, तुषार अंकुश नाणेकर यांच्या हस्ते हे सुरक्षा कीट वाटप करण्यात आले असून सदर उपक्रमास प्रतीक नाणेकर, ऍडव्होकेट ज्ञानेश्वर पवार, अमोल पऱ्हाड इ. उपस्थित होते.