Thursday, September 28, 2023
Homeपुणेमावळमावळातील पर्यटन स्थळांवर वर्षा विहारासाठी प्रतिबंध...

मावळातील पर्यटन स्थळांवर वर्षा विहारासाठी प्रतिबंध…

मावळ तालुक्यातील धरण परिसर व इतर पर्यटन क्षेत्रामध्ये वर्षा विहारासाठी येणाऱ्या पर्यटकांना प्रतिबंध करण्याचे आदेश मावळ मुळशी उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांनी दि. 04 रोजी पारित केले असून, तालुका आप्पत्ती व्यवस्थापन प्रमुख मावळ तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी मावळ तालुक्यातील टाकवे बु !, फळणे, माऊ, वडेश्वर, नागाथली, वहनगाव,कुसवली, बोरवली, डाहुली, सावळे, कुसूर, निळशी, खांडी, राजमाची, फनसराई, उधेवाडी, जांभवली, तसेच लोणावळ्यातील भुशी धरण परिसर, पवना धरण परिसर, तुंगार्ली धरण परिसर, मंकी पॉईंट व खंडाळा, घुबड तलाव, ड्युक्स नोज कुरवंडे, घोरावडेश्वर डोंगर, कार्ला लेणी, एकविरा मंदिर, भाजे लेणी, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, शिवलिंग पॉईंट त्याच बरोबर येथील किल्ले लोहगड, विसापूर, तुंगी, तिकोणा इत्यादी किल्ले व आंबेगाव धबधबा, दुधिवरे येथील प्रसिद्ध प्रति पंढरपूर मंदिर या ठिकाणी कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये.

व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पुढील आदेश येईपर्यंत पर्यटनासाठी प्रतिबंध करण्यात आले असून सदर आदेशाची कोणतीही व्यक्ती अथवा संस्था संघटना यांनी उल्लंघन केल्यास केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 भा. द. संहिता 1860 च्या कलम 188 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे मावळ तहसीलदार यांच्याकडून सर्व संबंधित यंत्रणा तसेच पोलीस निरीक्षक यांना सांगण्यात आले असता त्यांच्या अधिनस्त पर्यटनस्थळांवर सदर आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याची दक्षता घेणेबाबत आवश्यक ते तात्काळ निर्देश द्यावेत आणि आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करून त्याचा दैनंदिन अहवाल कार्यालयास सादर करण्याची ताकीद करण्यात आली आहे.

- Advertisment -