Sunday, December 8, 2024
Homeपुणेमावळमावळातील पवनानगर परिसरात युवकाचा खून; तपासात पोलिसांची कसोशी..

मावळातील पवनानगर परिसरात युवकाचा खून; तपासात पोलिसांची कसोशी..

मावळ : तालुक्यातील पवनानगर येथील प्रभाचीवाडी परिसरात एका युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (१ नोव्हेंबर) सकाळी उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मृत व्यक्तीचे नाव नीलेश दत्तात्रय कडू (वय ३०, रा. सावंतवाडी, महागाव) असे असून, त्यांच्या हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रभाचीवाडी महागाव हद्दीत अज्ञात व्यक्तींनी नीलेश यांचा दगडाने ठेचून खून केला असल्याची माहिती लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मायने, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ आणि पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, या प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
पोलीस आरोपींचा कसून शोध घेत असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page