मावळातील पाचणे येथील एका हॉटेलवर चोरट्याचा डल्ला तब्बल 1,31,128 किंमतीचा ऐवज लंपास…

0
56

तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यातील पाचाणे येथील हॉटेल एल एन रेस्टोरंट आणि बार या हॉटेलमध्ये चार वाहनातून आलेल्या चोरट्यांनी चोरी केली . हॉटेलमधून विदेशी दारू आणि सीसीटीव्हीचा डीव्हीआर बॉक्स असा एकूण 1लाख 31 हजार 128 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला . ही घटना सोमवार दि.25 रात्री साडेअकरा ते मंगळवार दि.26 रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली . प्रकाश शंकर येवले ( वय 51 , रा . पाचाणे मावळ ) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादेनुसार मारुती सुझुकी अल्टो ( MH12 / CY 4703 ) , मारुती सुझुकी अल्टो ( MH14/ BC 6643 ) , मारुती सुझुकी अल्टो ( MH 14 / FM 4529) हिरो स्प्लेंडर दुचाकी ( MH 14 / JQ 5198 ) या वाहनावरून आलेल्या चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी यांचे मावळ तालुक्यातील पाचाणे येथे हॉटेल एल एन रेस्टोरंट आणि बार नावाचे हॉटेल आहे . फिर्यादी यांनी त्यांचे हॉटेल सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास कुलूप लावून बंद केले . त्यानंतर आरोपी चोरटे हॉटेलच्या मागील बाजूला असलेल्या बेसिनच्या खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून हॉटेलमध्ये आले . चोरट्यांनी हॉटेलमधून विदेशी दारू आणि सीसीटीव्हीचा डीव्हीआर असा एकूण 1 लाख 31 हजार 128 रुपयांचा ऐवज चोरून नेला. तळेगाव दाभाडे पोलीस अधिक तपास करत आहेत.