Wednesday, May 29, 2024
Homeपुणेमावळमावळातील लक्ष भवर व देवीक भवर यांची जिल्हास्तरीय योग स्पर्धेत भरारी, विभागीय...

मावळातील लक्ष भवर व देवीक भवर यांची जिल्हास्तरीय योग स्पर्धेत भरारी, विभागीय स्पर्धेसाठी निवड…

मावळ ( प्रतिनिधी ) : सातारा जिल्हा क्रीडा विभाग यांच्या माध्यमातून आयोजित खंडाळा तालुका योग स्पर्धेमध्ये मावळातील लक्ष महादेव भवर आणि देविक महादेव भवर या दोन सख्या भावंडांनी प्रथम क्रमांक पटकावीत पुणे जिल्हास्तरीय स्पर्धेत भरारी मारली.दि.3 रोजी जिल्हास्तरीय योग स्पर्धेत या दोन बालकांनी बाजी मारत विभागीय स्पर्धे साठी त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे,जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या जिल्हास्तरीय शालेय योगासन स्पर्धेमध्ये समता माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विध्यार्थी व मावळ तालुक्यातील भूमिपुत्र संत तुकाराम नगर वाकसई चाळ येथील महादेव भवर यांचे दोन्ही पाल्य 1) लक्ष महादेव भवर याची (रिदमिक) तर 2) देवीक महादेव भवर याची (ट्रॅडिशनल) अशी विभागीय योगासन स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
दोन्ही विजेते हे सर मुकेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली शिकत असून या विध्यार्थ्यांना जिल्हास्तरीय पातळीवर घडविण्यासाठी मुख्यध्यापक माने सर व संस्थेच्या अध्यक्षा खिलारे मॅडम व विकास पाटोळे सर, सचिव पवन सूर्यवंशी यांनी विशेष परिश्रम घेतले.
- Advertisment -

You cannot copy content of this page