मावळ ग्लोबल ऑर्गनायझेशन चे देवले गावामध्ये बचत गटातील महिलांना व्यवसाय मार्गदर्शन…

0
194

लोणावळा दि.27 : ग्लोबल ऑर्गनायझेशन तळेगाव दाभाडे आयोजित उद्योजक्ता शिबीर 26 जानेवारी रोजी देवले मावळ येथे पार पडले. सदर शिबिरात बचत गटातील सदस्यांना केक बनवणे, चॉकलेट बनवणे याविषयी मार्गदर्शन करत फॅशन डिझाईनिंग विषयी माहिती देण्यात आली.

तसेच सर्व उद्योगांवर मोफत प्रशिक्षण व मार्केटिंग याबद्दल बी. डी. माने यांनी सर्व सदस्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन सुवर्णा बापू माने यांनी केले होते. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सदर कार्यक्रमाचे प्रथम वर्ष असल्यामुळे उपस्थित महिलांनी हळदी कुंकू, उखाणे घेणे व पारंपारिक गाणी गाणे इत्यादी कलागुणांचा कार्यक्रम आयोजित केला होता.

ग्लोबल ऑर्गनायझेशन मार्फत उपस्थित सदस्यांना वाण म्हणून चहाचे ट्रे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमावेळी सर्व बचत गट सदस्य महिलांनी दरवर्षी 26 जानेवारी च्या दिवशी असेच हळदी कुंकू व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे अशी इच्छा सर्व उपस्थित महिलांकडून व्यक्त करण्यात आली.

ग्लोबल ऑर्गनायझेशन तळेगाव दाभाडे आयोजित महिला बचत गट व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे देवले येथील हे पहिलेच वर्ष असल्याने येथील महिलांनी व सदस्यांनी अगदी उत्सहाने केक कापून सदर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

सदर कार्यक्रमयशस्वी पार पडावा म्हणून सर्व बचत गट अध्यक्ष व इतर पदाधिकारी तसेच सदस्यांनी उपस्थित रहावे यासाठी राधिका पोळ, संगीता महेंद्र आंबेकर ( सरपंच ), शारदा श्रीरंग आंबेकर, जिजा साहेबराव ओझरकर, उषा पांडुरंग आंबेकर, पूनम घिसरे, सुवर्णा आंबेकर, वर्षा आंबेकर, सुनीता आंबेकर, दिपाली आंबेकर यांचे उत्तम सहकार्य लाभले असून, सरपंच संगीता महेंद्र आंबेकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.