Friday, June 14, 2024
Homeपुणेलोणावळामावळ तालुका तायक्वादो असोसिएशनच्या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त कै.दत्तात्रय गवळी स्मृतीचिन्ह प्रदान..

मावळ तालुका तायक्वादो असोसिएशनच्या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त कै.दत्तात्रय गवळी स्मृतीचिन्ह प्रदान..

लोणावळा (प्रतिनिधी): मावळ तालुका तायक्वांदो असोसिएशनचा 25 वा वर्धापन दिन संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा भांगरवाडी, लोणावळा. येथे रविवार दिनांक 19 मार्च 2023 रोजी उत्सहात संपन्न झाला.असोसिएशनला 2023 साली 25 वर्ष (रौप्य महोत्सवी वर्ष) पूर्ण झाली आहे. अनेक खडतर मार्गातून प्रवास करत या संस्थेने रोपट्याचे रूपांतर वृक्षात केले आहे.ते केवळ संस्थापकीय कार्याध्यक्ष कै.दत्तात्रय कों. गवळी व संस्थापक अध्यक्ष मास्टर विक्रम बोभाटे सर यांच्या प्रचंड मेहनतीने आजचा सुदीन आला, तसेच त्यांच्याबरोबर असणारे सदस्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे.
आज या संस्थेतून 1700 विद्यार्थी शिकून बाहेर पडले आहेत व शिकत आहे.या संस्थेच्या विध्यर्थ्यांनी पर राज्यात अनेक पदक मिळवून नावलौकिक केले आहे.या संस्थेच्या मावळात व लोणावळ्यात विविध ठिकाणी शाखा आहेत त्याठिकाणी तायक्वोंदोचे क्लासेस घेतले जातात.
या संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कै.दत्तात्रय कों. गवळी यांच्या नावाचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.तसेच वर्ष भरात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, राज्यस्तरीय, तालुकास्तरीय विविध स्पर्धांमध्ये सुवर्ण,रौप्य, कास्यपदक मिळवलेल्या खेळाडूंनाही सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहेत.कार्यक्रमात प्रथम कै. दत्तात्रय कों. गवळी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत पुष्प वाहण्यात आली.
तदनंतर दीप प्रज्वलन माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधरजी पुजारी,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस निखिल कवीश्वर,संस्थेचे कार्याध्यक्ष गणेश दत्तात्रय गवळी, संस्थापक अध्यक्ष मास्टर विक्रम बोभाटे सर यांच्या हस्ते करण्यात आले,यावेळी संस्थेचे सरचिटणीस हर्षल होगले, सदस्य मुस्लिम को.ऑप.बॅक लि.पुणे संचालक जाकीर खलिफा आदी मान्यवर उपस्थित होते.
निखिलजी कविश्वर यांनी संस्थेबद्दल माहिती व विविध अनुभव सांगितले.सुरेखाताई जाधव यांनी कै. दत्तूभाऊ व विक्रम बोभाटे सर यांनी कशाप्रकारे संस्था उभारणीसाठी खडतर प्रवास केला याचे वर्णन केले.श्रीधर पुजारी यांनी संस्थेबद्दल अनुभव व्यतीत करत येणाऱ्या अडचणी सोडवण्याबद्दल तप्तर आहे असे सांगितले. नारायण पाळेकर माजी उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर,माजी नगरसेवक दिलीप लोंढे यांनीही आपले विचार मांडले.
यावेळी व्यासपीठावर यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिर्के, माजी सभापती जितूभाई कल्याणजी, राष्ट्रवादी काँग्रेस लोणावळा कार्याध्यक्ष रवी पोटफोडे, माजी सभापती यशवंत पायगुडे, चैतन्य नागरी सहकारी पतसंस्था लोणावळा संस्थापक मारुतीदादा साठे, माजी नगरसेवक दत्तात्रय येवले, युवक राष्ट्रवादी काँग्रेस युवक शहराध्यक्ष विनोद होगले, माजी युवक अध्यक्ष सनी पाळेकर,मानव अधिकार शहराध्यक्ष योगेश पैलकर, उद्योजक रवी भोईने,उद्योजक मनोज द. गवळी, श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक सूर्यकांत औरंगे, संचालक प्रशांत गवळी,पुणे जिल्हा पत्रकार संघ महिलाध्यक्षा श्रावणी कामत, सुनील चव्हाण,तसेच सरचिटणीस हर्षल होगले, सदस्य अमोल गायकवाड, पार्थ गवळी,संस्कृती गवळी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाकीर खरीफा यांनी केले तर आभार जितेंद्र कल्याणजी यांनी मांडले कार्यक्रमा अंतर्गत खेळाडूंचे विविध गुणदर्शनाचा लाभ मान्यवर,विद्यार्थी व पालकांनी घेतला, कार्यक्रमात अनेक प्रेक्षकांनी हजेरी लावली.
- Advertisment -

You cannot copy content of this page