मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षापदी दिपाली गराडे…

0
54
वडगाव मावळ : धामणे गावच्या सरपंच दिपाली गराडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुका महिला अध्यक्षा पदी निवड करण्यात आली आहे.दि.18 रोजी वडगाव मावळ येथे पार पडलेल्या महिला कार्यकारिणी आढावा बैठकीत सर्वानुमते हि निवड करण्यात आली आहे.

यावेळी अनेक महिलांना पदे वाटप करण्यात आली असून धामणे गावच्या सरपंच दिपाली गराडे यांची मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी पुष्पा घोजगे , कार्याध्यक्ष पदी कल्याणी विजय काजळे , तळेगाव शहराध्यक्ष पदी शैलजा कैलास काळोखे , कार्याध्यक्ष पदी अर्चना दाभाडे , लोणावळा शहराध्यक्षपदी उमा मेहता , कार्याध्यक्ष पदी संयोगीता साबळे , देहूरोड शहराध्यक्ष पदी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डच्या माजी उपाध्यक्षा अरुणा नंदकूमार पिंजण , कार्याध्यक्षपदी सविता जाधव , वडगाव शहराध्यक्ष पदी पद्मावती राजेश ढोरे , देहु शहराध्यक्ष पदी रेश्मा मयूर मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा भारती शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार सुनिल शेळके , तालुकाध्यक्ष गणेश खांडगे , कार्याध्यक्ष साहेबराव कारके , माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर , माजी तालुकाध्यक्ष बबन भेगडे , कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदू धनवे , मावळत्या महिला तालुकाध्यक्षा सुवर्णा राऊत , ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष संदीप आंद्रे , संजय गांधी योजनेचे अध्यक्ष नारायण ठाकर यांच्या आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली हि बैठक संपन्न झाली.

मावळ तालुक्यातील महिलांचे उत्कृष्ट संघटन निर्माण झाले आहे . पण ठराविक काळानंतर संघटनेच्या विविध पदांवर नवीन कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी देण्याचा पक्षाचा प्रोटोकॉल आहे . आज पक्षाच्या विविध पदांवर नियुक्ती झालेल्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन , सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व पवार साहेबांचे विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविण्याचे कार्य करण्यासाठी पक्ष संघटनेसाठी वेळ दया असे नवनिर्वाचित महिला पदाधिकारी यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे.