
मावळ (प्रतिनिधी) : मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. सोमवार दि.26 रोजी श्री. साईबाबा सेवाधाम, कान्हे फाटा येथे हा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
या दिनदर्शिकेचे प्रकाशन गुरूवर्य स्वामी निरंजनानंद सरस्वती (परमहंस महाराज) यांच्या शुभहस्ते व ह.भ.प. श्री साईबाबा सेवाधामच्या प्रोजेक्ट मॅनेजर डॉ. स्वातीताई वेदक, नवलाख उंबरे मा. उपसरपंच ह.भ.प. एकनाथ शेटे, मावळ तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष भारत काळे, मा. सभापती सुवर्णाताई कुंभार, ह.भ.प. शिवाजी पवार, अध्यक्ष ह.भ.प. नंदकुमार महाराज भसे, भरत येवले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी श्री. पांडुरंगाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळ हे अत्यंत प्रामाणिकपणे व निस्वार्थी भावनेने काम करत आहे. त्यामुळेच हे मंडळ अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहे.
बालवारकरी शिबीर, कार्तिकी व आषाढी वारीनिमित्त वारकरी सेवा, आरोग्य शिबीर इत्यादी सामाजिक उपक्रम या मंडळाने यशस्वीरित्या राबवले आहेत, अशी भावना ह.भ.प. स्वामी निरंजनानंद सरस्वती (परमहंस महाराज) यांनी व्यक्त केली. इतर मान्यवरांनी मंडळाच्या कार्याला उजाळा देत शुभेच्छा व्यक्त केल्या.
सालाबादप्रमाणे याही वर्षी मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाच्या वतीने सुमारे पाच हजार दिनदर्शिका छापण्यात आल्या असून येत्या काही दिवसांत त्यांचे संपूर्ण मावळ तालुक्यात वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी मावळ तालुक्यातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यानंतर महिला भगिनींचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला.
हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मंडळाचे कोषाध्यक्ष ह.भ.प. बजरंग घारे, सहसचिव नितीन आडिवळे सर, अॅड. सागर शेटे, दीपक रावजी वारिंगे, शांताराम , गायखे, निलेश शेटे, सुखदेव गवारी, सुनिल महाराज वरघडे, महादूबुवा नवघणे, लक्ष्मण ठाकर, सुभाष महाराज पडवळ, बळवंत येवले, पंढरीनाथ वायकर, गोविंद सावले शांताराम लोहर यांसह सर्व विभागीय अध्यक्ष, विभाग प्रमुख व ग्रामप्रतिनिधी यांनी विशेष प्रयत्न केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव ह.भ.प. रामदास पडवळ यांनी केले तर सूत्रसंचालन उपाध्यक्ष दिलीपजी वावरे यांनी केले व आभार कार्याध्यक्ष संतोषजी कुंभार यांनी मानले.ह.भ.प. बाबाजी महाराज काटकर व ह.भ.प. नाथा महाराज शेलार यांच्याकडून पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली.