Saturday, July 27, 2024
Homeपुणेवडगावमावळ तालुक्यातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी,पीएमपीएमएल च्या पास सेवेचे वडगांव मावळ येथे लोकार्पण…

मावळ तालुक्यातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी,पीएमपीएमएल च्या पास सेवेचे वडगांव मावळ येथे लोकार्पण…

मावळ (प्रतिनिधी):पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबुराव वायकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून नगराध्यक्ष मयूर प्रकाश ढोरे यांच्या वतीने मावळ तालुक्यातील विद्यार्थी, कामगार,ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य जनतेसाठी पीएमपीएमएल पास सेवा केंद्राचे लोकार्पण जि.प. माजी सभापती बाबुराव वायकर यांच्या उपस्थितीत पीएमपीएमएल चे चीप ट्रान्सपोर्ट मॅनेजर सतीश गव्हाणे,राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब भेगडे, मावळ तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाळासाहेब ढोरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
मावळ तालुक्यात पीएमपीएमएल ची बस सेवा निगडी-वडगाव मावळ, निगडी-लोणावळा, निगडी ते टाकवे, निगडी ते नवलाख उंब्रे, निगडी ते उर्से, निगडी ते गहुंजे या मार्गावर चालू असते. त्यातच वडगाव शहरात तहसील कार्यालय,पंचायत समिती, न्यायालय, पोलीस ठाणे, विविध शासकीय कार्यालये, बँका, शैक्षणिक संस्था आहेत. तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड, हिंजवडी, चाकण येथील शासकीय कार्यालये, उद्योग व्यवसाय, शैक्षणिक संस्थांमध्ये काम करणारा कर्मचारी वर्ग व्यावसायिक, विद्यार्थी व ग्रामीण भागातील नागरिकांना कामासाठी ये-जा करावी लागते.
अनेक कर्मचारी वडगावात राहत असून, तालुक्यातील मोठ्या संख्येने कर्मचारी इतर नागरिक बसने प्रवास करत असतात. या सर्वांना सवलतीचा पास घेण्यासाठी निगडी येथे जावे लागत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय व अर्थिक नुकसान होत असल्याने आता या नवीन झालेल्या पास केंद्रामुळे तालुक्यातील नागरिकांचा सवलत पास साठी जाणारा वेळ, अर्थिक नुकसान तसेच गैरसोय थांबणार आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब भेगडे, पीएमपीएमएल चे चीफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर सतीश गव्हाणे, जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर, मावळ तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाळासाहेब ढोरे, नगराध्यक्ष मयूर ढोरे, नगरसेवक राजेंद्र कुडे, निगडी पास विभाग प्रमुख नितीन घोगरे, डेपो मॅनेजर शांताराम वाघिरे, वाहतूक नियोजन अधिकारी वर्पे सर, आंदर मावळ प्रवासी संघ अध्यक्ष राजू शिंदे, वाहतूक नियोजन अधिकारी विजय रांजणे, माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम असवले, नगरसेवक मंगेश खैरे, वडगाव शहर काँग्रेस आय अध्यक्ष गोरख ढोरे, वडगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष अतुल वायकर, सामाजिक कार्यकर्ते बारकू ढोरे, दिलीप वहिले, चंदुकाका ढोरे, अर्जुन ढोरे, नितीन भांबळ, सुरेश कुडे, कार्याध्यक्ष सुरेश जांभुळकर, युवा उद्योजक युवराज ढोरे, उपाध्यक्ष सोमनाथ भोसले, उद्योजक सचिन कडू, वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष मजहर सय्यद, राष्ट्रवादी काँग्रेस वडगाव शहर ओबीसी सेल अध्यक्ष मयूर गुरव, राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष प्रणव ढोरे, युवा उद्योजक यश चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ धोंगडे, गौतम सोनवणे, गिरीष सावले आणि वडगाव शहरातील ज्येष्ठ नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाबुराव आप्पा वायकर यांच्या वाढदिवसानिमित्त नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी स्वखर्चातून दिलेल्या या पास केंद्राचा तालुक्यासह वडगाव शहरातील विद्यार्थी, कामगार वर्ग, ज्येष्ठ नागरिक ते सर्वसामान्य जनतेला कायमस्वरूपी लाभ मिळणार आहे अशी माहिती नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी दिली.
- Advertisment -

You cannot copy content of this page