Thursday, September 28, 2023
Homeपुणेलोणावळामावळ तालुक्यातील पर्यटन स्थळे पर्यटनासाठी आजपासून खुली,पुणे जिल्हाधिकारी यांचा आदेश...

मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळे पर्यटनासाठी आजपासून खुली,पुणे जिल्हाधिकारी यांचा आदेश…

लोणावळा : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी 7 जून रोजी पुणे जिल्हाधिकारी यांनी पुणे जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळांवर निर्बंध घातले होते.मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याने आज जिल्हाधिकारी यांनी मावळातील पर्यटन स्थळांवरील निर्बंध रद्द करून पर्यटनास खुली केली आहेत.
मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळांवर अवलंबून असलेले ग्रामीण व शहरी भागातील व्यवसाय ठप्प झाल्याने येथील सामान्य जिवन विस्कळीत झाले होते. ही पर्यटन स्थळे सुरु व्हावीत म्हणून व्यवसाय संघटना, पवना कृषी पर्यटन संघटना तसेच मावळातील लहान मोठया व्यावसायिकांनी आमदार सुनील शेळके यांच्याकडे मागणी केली होती.
व्यावसायिकांच्या मागणी नुसार सुनील शेळके यांनी पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून मावळातील सर्व पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी सुरु करण्यासाठी प्रयत्न केले त्याच प्रयत्नातून आज जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मावळातील पर्यटन स्थळे सुरु केल्याचा आदेश पारित केला आहे. ह्या आदेशामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून. शासकीय निर्देशांचे पालन करत आपापले व्यवसाय करण्यात यावे असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
- Advertisment -