मावळ तालुक्यातील लसीकरण केंद्र उदया राहणार बंद…

0
65
मावळ दि.6: उदया शनिवार दि.7 कोविशिल्ड लस उपलब्ध नसल्यामुळे संपूर्ण मावळ तालुक्यात सर्व लसीकरण केंद्र बंद राहणार असून कोवॅक्सीन चा दुसरा डोस वडगाव मावळ कान्हे येथील ग्रामीण रुग्णालयात सुरु राहणार आहे.
मावळात पुन्हा लसीचा तुटवडा होत आहे. या आठवड्यात फक्त चार तारखेला लस उपलब्ध झाली असून इतर दिवस लसीकरण केंद्र बंद राहिल्यामुळे नागरिकांना हेलपाटे मारावा लागत असून त्याबाबत नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.