मावळ तालुक्यात अगदी साध्या पद्धतीने स्वातंत्र्यदिन साजरा….

0
108

कार्ला मावळ – प्रतिनिधी -गणेश कुंभार दी.15 ऑगस्ट 2020 आज देशाचा 74 वा स्वातंत्र्यदिन असून, संपूर्ण देशभरात दरवर्षी आजच्या दिवशी हा स्वातंत्र्यदिन मोठया उत्साहात साजरा केला जात असत. परंतु आज कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात अगदी साध्या पद्धतीने फक्त ध्वजारोहण करून, राष्ट्रगीत गाऊन मानवंदना देत मोजक्याच लोकांमध्ये सोशिअल डिस्टंसिंगचे पालन करत साजरा करण्यात आला. त्याच प्रमाणे मावळ तालुक्यात दरवर्षी स्वातंत्र्यदिन हा मोठ्या उत्साहापुर्ण वातावरणात विद्यार्थांच्या उपस्थितीत गावागावात प्रभातफेरी व देशभक्तीपर घोषणा देत साजरा होत असतो परंतु कोरोना रोगाच्या वाढत्या संख्येमुळे यावर निर्बंध आले होते.

त्याच बरोबर कार्ला येथे ग्रामपंचयात कार्यालयासमोर सरंपच रुपाली हुलावळे, तलाठी कार्यालयासमोर मंडल आधिकारी मानिक साबळे,एकविरा विद्यालयात मुख्याध्यापक शहाजी लाखे,प्राथमिक शाळेत व्य समिती अध्यक्षा पल्लवी हुलावळे,आरोग्य केंद्रांत डाॕ भारती पोळ,वेहरगाव ग्रामपंचयात व प्राथमिक विद्यालयात सरंपच चंद्रकांत देवकर,शिलाटणे ग्रामपंचायत मध्ये सरंपच गुलाब आहिरे,प्राथमिक शाळेत उपसरपंच कांचन भानुसघरे,दहिवली शाळेत उपसरपंच राखी पडवळ,देवघर ग्रामपंचयात सरंपच दिपक काशिकर,प्राथमिक शाळा गणेश देशमूख,वाकसई शाळा पूनम येवले,करंडोली शाळेत जिल्हापरिषद सदस्या कुसुम काशिकर,देवले ग्रामपंचायतमध्ये सरंपच महेंद्र आंबेकर,शाळेमध्ये व्य स अध्यक्षा भाग्यश्री देसाई,भाजे ग्रामपंचयात सरंपच चेतन मानकर,जिल्हापरिषद शाळेत उपसरपंच सविता शिवेकर,मळवली ग्रामपंचयतमध्ये तुकाराम ठोसर,प्राथमिक शाळा माजी सरंपच जमूना पटेकर,तलाठी कार्यालय इथे तलाठी मिरा बो-हाडे, पो पाटील शहाजान इनामदार,पाटण ग्रामपंचायतमध्ये सरंपच रुपाली पटेकर,प्राथमिक शाळा शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष रामदास सणस,बोरज प्राथमिक शाळा हिरामण केदारी व हनुमंत केदारी यांच्याहस्ते झेंडावंदन करण्यात आले.


यावेळी कार्ला परिसरातील सर्व गावातील सरंपच,उपसरपंच,पोलिस पाटील,ग्रामपंचयात सदस्य,सदस्या,तंटामुक्ती अध्यक्ष,दक्षता समिती सदस्य व प्रतिष्ठीत नागरिक सर्वांनी आपापल्या भागात झेंडावंदनाचा कार्यक्रम पार पाडला.