Thursday, November 21, 2024
Homeक्राईममावळ तिहेरी हत्याकांडाचा मुस्लिम बांधवांचा तीव्र निषेध: दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी..

मावळ तिहेरी हत्याकांडाचा मुस्लिम बांधवांचा तीव्र निषेध: दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी..

तिहेरी हत्याकांडाने मावळ हादरले: आईच्या मृतदेहासह दोन मुलांना जिवंतपणी फेकले नदीत..

मावळ : ( श्रावणी कामत ) प्रेमसंबंधातून गर्भवती झालेल्या एका विवाहितेचा गर्भपातादरम्यान मृत्यू झाला. तिचा मृतदेह आणि आरडाओरडा करणाऱ्या तिच्या दोन मुलांना नदीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना मावळ तालुक्यात घडली. या तिहेरी हत्याकांडाने मावळ तालुका हादरला आहे.
मावळ तालुक्यातील २५ वर्षीय विवाहित महिला आणि तिचे पाच व दोन वर्षीय मुलांचे हत्या प्रकरण उघडकीस आले आहे. गजेंद्र जगन्नाथ दगडखैर (वय ३७, रा. समता कॉलनी, वराळे, ता. मावळ), रविकांत भानुदास गायकवाड (वय ४१, रा. सावेडी, ता. जि. अहमदनगर), गर्भपात करणारी एजंट महिला, कळंबोली येथील हॉस्पिटलमधील संबंधित डॉक्टर आणि त्यांना मदत करणाऱ्या सर्वांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस उपायुक्त बापू बांगर यांच्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यांतर्गत विवाहित महिला समरीन बेपत्ता असल्याचे मिसिंग प्रकरण दाखल करण्यात आले होते. चौकशी दरम्यान, समरीन हिच्या प्रियकराने तिला गर्भपातासाठी मित्रासह ठाण्याला पाठविले होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्यावर प्रियकराच्या मित्राने समरीनचा मृतदेह आणि तिच्या दोन मुलांना परत आणले. ९ जुलै २०२४ रोजी पहाटे प्रियकराच्या मदतीने समरीनचा मृतदेह इंद्रायणी नदीत फेकण्यात आला. हा प्रकार पाहून समरीनची दोन्ही मुले आरडाओरडा करू लागली. दोन्ही मुलांना जिवंतपणी नदीत फेकण्यात आले. तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गजेंद्र दगडखैर आणि त्याचा मित्र रविकांत गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे.
या तिहेरी हत्याकांडाचा निषेध मावळ तालुका मुस्लिम समाजाने व्यक्त केला आहे. त्यांनी पोलीस आयुक्त पिंपरी-चिंचवड आणि मावळ तहसीलदारांना निवेदन दिले आहे. तपासात कोणाचाही हस्तक्षेप न करता आरोपींना फाशीची शिक्षा देऊन पीडित कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी मुस्लिम समाजाकडून करण्यात आली आहे.
यावेळी मुस्लिम समाज ट्रस्ट अध्यक्ष अयुबभाई शिकीलकर, ऍड. रियाज तांबोळी, पीडित मुलीचे वडील गुलाम कादर, शहानुर मुलानी, नदीम शेख, मुनीर बेग, सुलेमान कुरेशी, रियाज शेख, साजिदभाई शेख, सोहेल शिकीलकर, मन्सूर शहा, एजाज शिकीलकर, नदीम शेख नालबंद, शहादत सय्यद उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page