Sunday, April 21, 2024
Homeपुणेपिंपरी चिंचवडमावळ नागरिक प्रतिनिधी श्रावणी कामत यांची पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या महिला प्रतिनिधी...

मावळ नागरिक प्रतिनिधी श्रावणी कामत यांची पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या महिला प्रतिनिधी पदी निवड…

लोणावळा दि. 5 : पुणे जिल्हा पञकार संघाच्या कार्यकारिणीची महत्वाची बैठक सोमवार दि. ५ आँक्टोबर २०२० रोजी पत्रकार कक्ष महानगरपालिका पिंपरी चिंचवड येथे ठिक सकाळी ११ ते 2 वा. सुमारास संपन्न झाली .मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त आदरणीय एस. एम. देशमुख यांच्या सूचनेनुसार बैठकीचे आयोजन करून खालील विषयांवर चर्चा करण्यात आली त्यात मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्यात आले.
मागील जमा खर्चाचा आढावा घेण्यात आला, सभासद पत्रकारांना तसेच पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या सदस्यांना ओळखपत्र यावेळी प्रदान करून याबाबत अढावात्मक चर्चा करण्यात आली, हवेली, बारामती, दौंड, पुरंदर तालुका तसेच हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ चाकण च्या निवडणुकीबाबत चर्चा करून, निवडणुकांच्या तारखा ठरविण्यात आल्या, पुणे जि. पत्रकार संघाचा आर्थिक निधी उभारण्याबाबत चर्चा करण्यात आली.
पुणे जिल्हा पत्रकार संघांचे अध्यक्ष सुनील लोणकर यांच्या अध्यक्षतेखाली मावळ ,हवेली,बारामती,पुरंदर, दौंड तालुका पत्रकार संघा चे प्रतिनिधी उपस्थीत होते.सदर बैठकीत पुणे जिल्हा पञकार संघ कार्यकारीणी विस्तार करण्यात आला ,त्यात साप्ताहिक मावळ नागरिक च्या प्रतिनिधी श्रावणी कामत यांची जिल्हा महिला प्रतिनिधी म्हणून निवड कऱण्यात आली.
तसेच पुणे शहर पत्रकार संघाच्या प्रभारी अध्यक्षपदी बाबासाहेब तारे यांची निवड करण्यात आली. तर उर्वरित तीन विभागीय सचिव व उर्वरित जि. प्रतिनिधी यांची निवड पुढील बैठकीत करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. पार पडलेल्या बैठकीस मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे व पुणे विभागीय सचिव बापूसाहेब गोरे यांचे धोरणात्मक मार्गदर्शन लाभले.
पुणे जिल्हा पत्रकार संघ समन्वयक सुनील नाना जगताप ,पुणे जिल्हा पत्रकार संघ परिषद प्रतिनिधी एम.जी.शेलार,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सुनील वाळुंज ,सरचिटणीस सतीश सांगळे, कोषाध्यक्ष मनोहर तावरे, लोणावळा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष ऍड संजय पाटील ,पत्रकार संदीप मोरे आदी प्रतिनिधी, सदस्य, पत्रकार उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page