Monday, September 26, 2022
Homeपुणेमावळमावळ भाजपा महिला आघाडीच्या वतीने आशा सेविका व आरोग्य सेविका यांचा कोरोना...

मावळ भाजपा महिला आघाडीच्या वतीने आशा सेविका व आरोग्य सेविका यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान….


कार्ला कार्ला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मावळ महिला आघाडीच्या वतीने आशा सेविका,आरोग्य सेविका आणि कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधानपदाचे सात वर्ष यशस्वी पुर्ण झाल्याबद्दल सेवा कार्यदिन व सेवा सप्ताह दिनाचे औचित्य साधत मावळ तालुका महिला आघाडी भारतीय जनता पार्टी च्या वतीने कोरोना महामारीशी दोन हात करत रूग्ण सेवा करणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र कार्ला येथिल डॉक्टर, आशास्वयंसेविका व आरोग्यसेविका यांचा साडी चोळी तर रुग्णवाहिका गाडी चालक व सर्व आरोग्य कर्मचारी यांंचाही प्रशस्तिपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.

त्यावेळी माजी राज्यमंत्री संजय ( बाळा ) भेगडे, भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, मावळ तालुका महिलाध्यक्षा सायली बोत्रे, तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, जितेंद्र बोत्रे यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा करण्यात आला.तसेच चिक्की, मास्क शिल्डचे वाटपही यावेळी करण्यात आले.

- Advertisment -

You cannot copy content of this page